Mumbra Dog falls on Girl: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. त्यामध्ये काही व्हिडीओ हसवणारे असतात; तर काही व्हिडीओ रडवणारे असतात. काही व्हिडीओ असेही असतात की, जे पाहून धक्का बसतो. ठाण्यातील मुंब्रा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर पाचव्या मजल्यावरून कुत्रा पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. याचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्रा खाली पडला अन् चिमुकलीचा जीवच गेला मृत्यू कुणालाही कुठेही, कधीही व कसाही गाठू शकतो, हे अनेकदा अधोरेखित झालंय. मुंब्र्यातही अशीच घटना घडली. अमृतनगर परिसरातील चिराग नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक कुत्रा तीन वर्षीय मुलीच्या अंगावर पडला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं? या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोक रस्त्यावरून ये-जा करीत आहेत. त्यादरम्यान अमृतनगर भागातील दर्गा रोडवरून मंगळवारी दुपारी सना शेखही आईसोबत बाजारात निघाली होती. त्यावेळी एका पाच मजली इमारतीच्या गच्चीवरून लॅब्राडोर जातीचा पाळीव कुत्रा सनाच्या अंगावर पडला. हा कुत्रा उंचावरून इतक्या जोरात चिमुकलीच्या अंगावर पडला की, तिच्यासोबत असलेल्या आईलाही थोडा वेळ नक्की काय झालं हे कळलं नाही. त्यामध्ये पुढे दिसत आहे की, चिमुकलीची आई तिला उचलून घेत आहे. सीसीटीव्हीतील दृश्यांनुसार कुत्रा मुलीच्या अंगावर पडल्यानंतर ती बेशुद्ध झाली. जखमी अवस्थेत तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> Shocking: मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी तोंडावर…; घृणास्पद कृत्याचा VIDEO व्हायरल कुत्रादेखील खाली पडल्यानंतर काही काळ बेशुद्ध होता. परंतु, थोड्या वेळाने कुत्रा जागेवरून उठल्याचे व्हिडीओद्वारे समोर आले आहे. ‘हा कुत्रा पाळणाऱ्याने ठाणे महापालिकेची परवानगी घेतली होती का, याबाबत चौकशी करण्यात येत आहे’, अशी माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. या प्रकरणात मुलीच्या आईचा जबाब नोंदविण्यात आला असून, त्यांची कोणाविरुद्धही तक्रार नाही अथवा त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.