Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये अनेकदा काही ना काही कारणामुळे वादात असते. कधी एखादं जोडपं खुलेआमपणे प्रेम करताना दिसतात, तर कधी काही जण भांडताना दिसतात. अनेकदा मेट्रोमधील भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण मेट्रोमधून प्रवास करत असताना एका चोराला रंगेहात पकडतो, त्यानंतर तो भर प्रवाशांमध्ये असे काही करतो जे पाहून उपस्थित सर्व लोक हसू लागतात.

हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकाल की, अनेक प्रवासी एका चोराभोवती उभे आहेत. यावेळी एक तरुण तिथे व्हिडीओ बनवत लोकांनी घेरलेल्या चोराला विचारतो की, मला सांग, तू काय करत होतास? यावर तो चोर काहीतरी उत्तर देतो, पण त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. यानंतर व्हिडीओ बनवणारा तरुण जोरात ओरडत म्हणतो की, “आई, मी चोराला पकडले आहे”. तरुणाचे हे विधान ऐकताच उपस्थित लोकही जोरजोरात हसू लागतात. कारण घटना गंभीर असताना तरुण ज्याप्रकारे जोरात ओरडून बोलतो, ते ऐकून सर्व हसू लागतात.

Strange accident captured in bus camera
चालत्या बसमधून उतरली महिला अन् पुढे असं काही भयानक घडले की…, पाहा थरकाप उडवणारा VIDEO
This man entered the 165-year-old cave
मोठे धाडस! हा पठ्ठ्या शिरला चक्क १६५ वर्षे जुन्या गुहेत; पण पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, पाहा VIDEO
bujgavne viral video trending video farmer installed scary scarecrow in his field video goes viral on social media
शेतातला ‘हा’ भयानक VIDEO पाहून फुटेल घाम; रात्री पाहाल, तर उडेल कायमची झोप; असे आहे काय त्यात?
young man making Gulabjam Dosa
भावा, तू तर ‘वडापाव गर्ल’पेक्षा भारी; गुलाबजाम डोसा बनवणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल
drunk girl abuses gets into fight with boys in lucknows summit building
VIDEO: “तू मला मारणार…” मद्यधुंद तरुणीचा पबबाहेर धिंगाणा; तरुणांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ अन् मारहाण
Boy Tired of the heat took a bath while sitting on the scooty
भावाचा पारा चढला! उन्हाला वैतागून भररस्त्यातच गाडीवर बसून केली अंघोळ; VIDEO पाहून येईल हसू
Cobra Mother protecting eggs
नागीण चवताळली! अंड्यांचे रक्षण करतानाचा VIDEO होतोय व्हायरल; पाहून अंगावर येईल काटा..
Viral Video electric car with broken side mirror man jugaad and attaching a plastic mirror in its place
गाडीचा फुटला आरसा, चालकाने केला असा जुगाड की VIDEO पाहून पोट धरून हसाल

केदारनाथला जाण्यापूर्वी भररस्त्यात तरुण खुलेआमपणे पित होते दारू; पोलिसांनी पकडताच केले असे की…; पाहा VIDEO

यानंतर तो तरुण चोरीच्या कानशिलात वाजवत म्हणतो की, चोरी करतोस काय? या व्हिडिओमध्ये चोराच्या आजूबाजूला उभे असलेले लोकही त्या व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीकडे पाहून हसू लागतात. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यावर लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येत आहेत.

एका युजरने लिहिले की, व्हिडिओ मेकर आणि व्लॉगर्ससाठी दिल्ली मेट्रो ही सर्वोत्तम जागा आहे. आणखी एका युजरने लिहिले की, चोर पकडल्यानंतर या भावाला किती आनंदी झाला आहे? दुसऱ्या एका युजरने लिहिले की, शहरांमध्ये सर्वात मोठी समस्या ही आहे की, चोर आपल्याला शांततेत जगू देत नाहीत.

आणखी एका युजरने लिहिले की, या मुलाविरुद्ध एखाद्या व्यक्तीचा छळ, शोषण आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा. तिसऱ्या युजरने लिहिले की, आता व्लॉग बनवण्यासाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास केला पाहिजे. येथे कंटेंटची कमतरता नाही. शेवटी एका युजरने लिहिले की, दिल्लीतील सामान्य लोक चोरांमुळे खूप त्रस्त आहेत, मग ते मेट्रो असो किंवा बस, ते सर्वत्र पसरलेले आहेत.