रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांनी सोमवारी रात्री त्यांच्या नोबेल शांतता पुरस्काराचा लिलाव केला. युक्रेनमधील युद्धामुळे विस्थापित झालेल्या मुलांना मदत करण्यासाठी मुराटोव्ह लिलावातून मिळालेली रक्कम थेट युनिसेफला देणार आहेत. मुराटोव्ह, ज्यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये सुवर्णपदक मिळाले होते, त्यांनी स्वतंत्र रशियन वृत्तपत्र नोवाया गॅझेटची स्थापना केली आणि मार्चमध्ये जेव्हा पेपर बंद झाला तेव्हा ते त्याचे मुख्य संपादक होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेतील असंतोष दडपणे आणि पत्रकारांवरील कारवाईमुळे हे वृत्तपत्र बंद करण्यात आले.

मुराटोव्हने बक्षीस लिलावातून एका धर्मादाय संस्थेला ५ लाख डॉलरची रोख देणगी जाहीर केली आहे. निर्वासित मुलांना भविष्यासाठी संधी मिळावी हा या देणगीचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मुराटोव्ह यांनी एका मुलाखतीत सांगितले की, युक्रेनमधील संघर्षामुळे अनाथ झालेल्या मुलांबद्दल त्यांना विशेष काळजी आहे. त्यांचे भविष्य आम्हाला परत करायचे आहे, असे ते म्हणाले.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

हेरिटेज ऑक्शन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये मुराटोव्ह म्हणाले की रशियाविरूद्ध आंतरराष्ट्रीय निर्बंध दुर्मिळ रोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधे आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण सारख्या मानवतावादी मदतीला गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यापासून रोखत नाहीत हे महत्त्वाचे आहे. लिलाव प्रक्रिया आयोजित करणारे हेरिटेज ऑक्शन्स, या उत्पन्नामध्ये कोणताही भाग घेत नाही आहेत.

मुराटोव्ह यांना गेल्या वर्षी फिलिपिन्सची पत्रकार मारिया रेसा यांच्यासोबत संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आपापल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. मुराटोव्ह हे २०१४ मध्ये रशियाने क्रिमियावर मिळवलेला ताबा आणि युक्रेनच्या विरुद्ध पुकारलेले युद्ध याचे तीव्र टीकाकार आहेत.

Viral Video : रस्त्याच्या मध्यभागी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने केले ‘हे’ काम; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

युक्रेनमध्ये चार महिने सुरू असलेल्या भीषण युद्धाचा दोन्ही बाजूंच्या सैन्याच्या मनोबलावर विपरीत परिणाम होत असून अनेक ठिकाणी सैनिक आपल्या अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवज्ञा करत आहेत किंवा त्यांच्याविरुद्ध बंडही करत आहेत. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली. युद्धावरील दैनंदिन विश्लेषणात, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, डॉनबासमध्ये दोन्ही बाजूंचे लढवय्ये घनघोर युद्धात सामील आहेत आणि त्यांचे मनोबल बदलण्याची अपेक्षा आहे.

विश्लेषणात असे म्हटले आहे की “अलीकडच्या आठवड्यात सैनिकांनी देखील युक्रेनियन सैन्य सोडले आहे अशी भीती आहे.” त्यात म्हटले आहे की रशियाचे मनोबल अधिक क्षीण होण्याची शक्यता आहे. विश्लेषणात असे म्हटले आहे की रशियन सैन्याच्या संपूर्ण युनिट्सने ऑर्डर नाकारण्याच्या आणि अधिकारी आणि सैनिकांमध्ये सशस्त्र संघर्षाच्या वारंवार घटना घडत आहेत.