scorecardresearch

Viral: मुस्लिम जोडप्याने तिरुपती मंदिरात दिलं १ कोटीचं दान; नेटकरी मात्र कपड्यांवर भाळले

Viral News: चेन्नईचे व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीतील प्रमुख देवस्थान आहे.

Viral: मुस्लिम जोडप्याने तिरुपती मंदिरात दिलं १ कोटीचं दान; नेटकरी मात्र कपड्यांवर भाळले
मुस्लिम जोडप्याने मंदिरात दिली १ कोटीची देणगी (फोटो: ANI)

Viral News: धार्मिक वादाच्या भोवऱ्यात कधीतरी एखादी अशी घटना घडते ज्यामुळे खऱ्या अर्थाने एकोपा म्हणजे काय हे दिसून येतं. अशीच एक घटना यावेळेस चेन्नईमध्ये घडली आहे. चेन्नईतील सुबीना बानू व अब्दुल गनी या मुस्लिम जोडप्याने तिरुमला तिरुपती देवस्थानाला एक कोटी रुपयांची देणगी दिली. या देणगीमध्ये नव्याने बांधलेल्या पद्मावती विश्रामगृहासाठी ८७ लाख रुपयांचे फर्निचर आणि भांडी आणि एसव्ही अण्णा प्रसादम ट्रस्टसाठी 15 लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दिलेला आहे. या जोडप्याने तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला अलीकडेच हे दान दिले. या जोडप्याचा सहकुटुंब एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अब्दुल गनी यांनी मंदिराला देणगी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्ये, त्यांनी करोना महामारीच्या काळात मंदिराच्या आवारात जंतुनाशक फवारण्यासाठी बहु-आयामी ट्रॅक्टर-माउंट स्प्रेअर दान केले. यापूर्वी त्यांनी भाजीपाला वाहतूक करण्यासाठी ३५ लाख रुपयांचा रेफ्रिजरेटर ट्रक मंदिराला दान केला होता.

तिरुमला तिरुपती देवस्थानमला भेट देताना सुबीना बानू व अब्दुल गनी यांचे संपूर्ण कुटुंब पारंपरिक वेशात दिसून आले. ANI ने शेअर केलेल्या या फोटोखाली कमेंट करताना अनेकांनी या कुटुंबाच्या परिधानाची देखील विशेष दखल घेत कौतुक केले आहे.

Video: भर रस्त्यात खड्ड्यात उतरून केलं लग्नाचं फोटोशूट; नवरीचा भन्नाट लुक होतोय Viral

मुस्लिम जोडप्याने मंदिरात दिली १ कोटीची देणगी

दरम्यान, सोमवारी सुमारे ६७,२७६ भाविकांनी तिरुमला मंदिरात भगवान व्यंकटेश्वराची प्रार्थना केली. प्राप्त माहितीनुसार मंगळवार सकाळपर्यंत मंदिरात तब्बल १२ तास रांगेत प्रतीक्षा करून दर्शनासाठी भाविक थांबले होते. या एकाच दिवसात दानपात्रातून मंदिराला ५ कोटीहून अधिक देणगी प्राप्त झाली आहे. चेन्नईचे व्यंकटेश्वर मंदिर हे भारतातील श्रीमंत मंदिराच्या यादीतील प्रमुख देवस्थान आहे. अनेक भाविक स्वेच्छेने या मंदिरात मोठी देणगी देत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या