मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत अभूतपूर्व गर्दी झाली होती. गर्दीचा सागरच इथे मी पाहतो आहे असं उद्धव ठाकरेही म्हणाले. तसंच करोना काळात मालेगावकरांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी मालेगावच्या जनतेचे आभार मानले. या सभेत आलेला मुस्लिम मावळा लक्ष वेधून घेत होता. उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्या हृदयात आहेत आणि तेच महाराष्ट्राचे वाघ आहेत असं या मुस्लिम मावळ्याने म्हटलं आहे.

मुस्लिम मावळ्याने वेधलं लक्ष

मी संगमनेरहून सभेसाठी आलो आहे. उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आलो आहे. मातोश्रीचाच आदेश ऐकणार, उद्धव ठाकरे जिंकेपर्यंत लढणार असा बोर्ड या मावळ्याने अंगावर परिधान केला होता. तसंच भगवा झेंडाही हाती घेतला होता. त्यामुळे हा मावळा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप

काय म्हटलं आहे संगमनेरहून आलेल्या मुस्लिम मावळ्याने?

मी उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आलो. ही निष्ठावंतांची सभा आहे. उद्धव ठाकरे यांचे विचार आमच्या हृदयावर कोरले गेले आहेत. पुढे ते काय काय बोलणार हे पाहण्यासाठी मी आलो आहे. गद्दारांची काय लायकी आहे हे त्यांना दाखवायला आलो. माझा रोजा आहे, इथेच रोजाच उघडणार आहे. मी सच्चा मुस्लिम मावळा आहे.

उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी आणि माझ्यासाठी जे केलं आहे ते कधीही विसरू शकणार नाही. करोना आला होता तेव्हा संपूर्ण भारतात मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं होतं, तेव्हा फक्त उद्धव ठाकरे नावाचा वाघ मुस्लिम समाजासाठी उभा राहिला. त्यांनी सगळे आरोप फेटाळले. मुस्लिम समाजाला आणि १८ पगड जातींना न्याय देणारा पर्मनंट मुख्यमंत्री म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे.

माझ्या खांद्यावर उद्धव ठाकरेंच्या विचारांचा भगवा

मी आज खांद्यावर भगवा घेतला आहे. हा भगवा विचारांचा आहे. आमच्या साहेबांचे विचार तेच आमचे विचार. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन विचार करणं, लोकांच्या घरी चूल कशी पेटेल त्यांना अन्न कसं मिळेल हे विचार करणारा हा भगवा झेंडा आहे. फक्त रंग म्हणून याच्याकडे पाहू नका असंही या मुस्लिम मावळ्याने म्हटलं आहे. आम्ही सात गाड्या भरून या सभेसाठी आलो आहे. उद्धव ठाकरे यांची भेट झाली तर या मावळ्याला काय हवं? असं म्हणत असताना या मावळ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.