कौतुकास्पद! मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा | Admirable! Muslim students win Ramayana quiz competition gps 97 | Loksatta

Kerala:कौतुकास्पद! मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा

डीसी बुक्सने नुकत्याच आयोजित केलेल्या रामायणावरील राज्यव्यापी ऑनलाइन क्विझच्या विजेत्यांची घोषणा केली.

Kerala:कौतुकास्पद! मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा
(Photo: Social Media)

Kerala: डीसी बुक्सने नुकत्याच आयोजित केलेल्या रामायणावरील राज्यव्यापी ऑनलाइन क्विझच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये पाच विजेत्यांपैकी पहिल्या दोन नावांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मलप्पुरममधील दोन मुस्लिम विद्यार्थी, मोहम्मद जबीर पीके आणि मोहम्मद बासिथ एम, ऑनलाइन रामायण प्रश्नमंजुषामध्ये अव्वल ठरले, ज्यात १००० हून अधिक लोकांनी भाग घेतला होता. हे दोघेही केकेएचएम इस्लामिक अँड आर्ट्स कॉलेज, वलेनचेरी येथे वेफी कोर्स करत आहेत. या दोघांच्या यशस्वी विजयानंतर विविध भागातील लोकांनी दोघांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

आठ वर्षांच्या वेफी कार्यक्रमांतर्गत, ते पदव्युत्तर स्तरापर्यंत इस्लामिक अभ्यास करत आहेत ज्यात नियमित विद्यापीठ पदवी अभ्यासक्रम देखील समाविष्ट आहे. जबीर म्हणाले की वाफी अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमात हिंदू धर्म, बौद्ध, जैन आणि शीख धर्माचा अभ्यास करणाऱ्या भारतीय धर्मांवरील पेपरचा समावेश आहे. अभ्यासक्रमाच्या भागात ख्रिश्चन,यहूदी धर्म, ताओइझम इत्यादींशी संबंधित पेपरही आहे.

(आणखी वाचा : वडिलांच्या अपघातानंतर ७ वर्षांचा मुलगा झाला झोमॅटो डिलिव्हरी बॉय, रात्री ११ वाजेपर्यंत सायकलवरुन करतो काम)

जाबीर म्हणाले, अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांनी रामायणावरील वाचनांचा अभ्यास केला आणि महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या मदतीने अतिरिक्त माहिती जाणून घेतली. “महाकाव्याचा अभ्यास करताना, मला समजले की सर्व धर्मातील लोकांनी एकमेकांच्या धार्मिक पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. विविध धर्मांचा अभ्यास केल्यास धर्माच्या नावावर होणारी हिंसा रोखण्यास मदत होईल. सर्व धर्म आपल्याला एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर करायला शिकवतात. रामायण सुद्धा प्रेम आणि शांतता या आदर्शांचे पालन करते. तसंच स्वतःच्या भावासाठी सत्तेचा त्याग, वडिलांच्या शब्दाचा आदर करणे आणि सुशासनाचे धडे रामायणमध्ये दिले आहेत,” असंही जाबीर म्हणाले.

(आणखी वाचा : Viral Video : हरिद्वारमधील हर की पौरी घाटावर गंगा नदीत माणसाने फडकावला तिरंगा, पाहा व्हिडीओ)

जाबीर म्हणाले की, मला डीसी बुक्सच्या टेलिग्राम ग्रुपद्वारे प्रश्नमंजुषा स्पर्धेची माहिती मिळाली आणि त्यासाठी त्यांनी स्वतःची नोंदणी केली. प्रश्नमंजुषाबाबत कोणतीही विस्तृत तयारी नसल्याचेही त्यांनी सांगितले. पेरिंथलमन्ना येथे राहणारा जबीर हा वेफी पीजीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून त्याने समाजशास्त्रात बीए केले आहे. मोहम्मद बासिथ, एक फेलो विजेता आणि मूळचा ओमनूरचा रहिवासी, वेफीच्या पाचव्या वर्षाचा विद्यार्थी, बीए मानसशास्त्राचा अभ्यास करत आहे. २३ ते २५ जुलै दरम्यान रामायण प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

संबंधित बातम्या

कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
आनंद महिंद्रा, तुम्ही भारतीय जावई का नाही निवडला? नेटकरी टोमणा मारायला गेला अन फसला, महिंद्रा म्हणतात..
Video: नग्नावस्थेत तब्बल २५०० लोकं पोहोचली एकाच ठिकाणी…कारण ऐकाल तर..
Optical Illusion: जादूगराचा ससा हरवलाय, तुम्ही त्याला शोधून द्याल का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुरतमध्ये रोड शोवरील दगडफेकीनंतर केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “२७ वर्षे काम केलं…”
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह पतीच सापळ्यात अडकला; औरंगाबाद येथील पथकाची कारवाई
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी