लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा शिक्षक लहान विद्यार्थ्यांना अभ्यास न केल्याने ओरडतात, त्यावेळी विद्यार्थी विचित्र बहाणे सांगू लागतात. यात विशेषत: लहान मुलांचे अभ्यास न करण्याचे बहाणे तर इतके भारी असतात, जे ऐकून अनेकदा हसू आवरणे अवघड होते. यात नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यात एक चिमुकला विद्यार्थी भर वर्गात त्याचे वडील पोलिस असल्याचे सांगून शिक्षिकेला धमकावताना दिसतोय; ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान विद्यार्थी रडत आपल्या शिक्षिकेला सांगत आहे की, त्याचे वडील पोलिसांत आहेत. यावर शिक्षिका त्याला विचारते की, तुझे वडील पोलिसात आहेत तर काय करायचे? यावर तो शिक्षिकेला उत्तर देतो की, ‘ते तुम्हाला गोळ्या घालतील, बंदूक पेटीच्या वर ठेवली आहे.’ यानंतर शिक्षिका चिमुकल्याला पुढे विचारते की, तु खरचं मला मारणार का, यावर चिमुकला होकारार्थी मान हलवतो. चिमुकल्याच्या या मजेशीर उत्तरांमुळे हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Murder Video Man kills woman with sword in broad daylight on her way to office in Mohali
‘तू माझी झाली नाहीस तर…’ लग्नास नकार दिल्याने महिलेची भररस्त्यात तलवारीने वार करून हत्या; थरारक VIDEO समोर
NEET UG 2024 As many as 44 students became toppers in NEET UG 2024 exam
NEET UG 2024: चुकीच्या उत्तरामुळे ‘NEET’ यूजी २०२४ परीक्षेचे तब्बल ४४ विद्यार्थी झाले टॉपर
Bihar student, suicide,
बाप रे… बिहारच्या विद्यार्थ्याची नागपुरात आत्महत्या, खोलीतून कुजलेला वास आल्याने…
HSC SSC Exam Result
वडिलांचं छत्र हरपलं, मुलानं रांगोळी, पणत्या विकल्या अन् दहावीत असे गुण मिळवले की सर्वांना अश्रू अनावर झाले
theft, girl, Andheri, fake,
चोरी दडवण्यासाठी कल्याणमध्ये अंधेरीतील तरुणीने रचला ॲसिड फेकल्याचा बनाव
Drunken Man, Drunken Man Rescued from BSNL Tower, Man Rescued from BSNL Tower in Yavatmal, Climbing for Cool Air,
नशा करी दुर्दशा! मद्याच्या नशेत टॉवरवर चढला अन्…
Opposing the bail, the prosecution stated that the accused “constantly harassed the victim… through WhatsApp mode, by stalking and by calling the victim at any time with vulgar conversation”.
अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी तरुणाला जामीन, ‘चांगल्या कुटुंबातला’ मुलगा असल्याने कोर्टाचा निर्णय
Nagpur Police, Arrest Youth for intimacy , arrest Youth for intimacy on 12th Standard Student, CCTV Investigation, Nagpur Police Arrest Youth for intimacy, Nagpur news, intimacy with a girl in Nagpur,
भरचौकात विद्यार्थिनीशी लगट अन् महिलेची सतर्कता, काय घडले…..

रस्त्यात स्कूटीवरून फिरताना दिसले कोहली अन् शिखर धवन? VIDEO पाहून युजर्स शॉक, म्हणाले…

हा व्हिडीओ एक्सवर @mpanktiya नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘पूर्वीची मुलं माझे काका आमदार आहेत सांगायचे, पण आत्ताची मुलं पप्पा आमचे पोलिसांत आहेत सांगतात. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने मजेशीरपणे लिहिले आहे – लहान मुलं मनाने एकदम खरी असतात.