बर्म्युडा ट्रँगलपाशी तयार झालं रहस्यमयी बेट

बर्म्युडा ट्रँगल रहस्य अधिक गुंतागुंतीचं होत चाललंय

अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरीडा आणि प्युर्टो रिकोदरम्यान बर्म्युडा ट्रँगल हा पट्टा येतो (छायासौजन्य : Chadonka)

हजारो माणसांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या आणि ७५ हून अधिक विमान आणि जहाज गायब झालेल्या बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य काही महिन्यांपूर्वी उलगडलं असं आपल्याला वाटत असतानाच आता या बेटासंबधीची आणखी एक गोष्ट समोर आलीय, त्यामुळे या बेटांचं रहस्य आणखी वाढलं आहे. उत्तर कॅरोलिनामध्ये केप पाँईंटजवळ एक बेट तयार झालाय. स्थानिकांनी या बेटाला ‘शेली आयलँड’ असं नाव दिलंय. बेट पूर्णपणे शिंपल्यांनी आच्छादलेले आहे, म्हणून स्थानिकांनी या बेटाला ‘शेली आयलँड’ असं नाव दिल्याचं ‘द सन’ने म्हटले आहे.

तेव्हा हे बेट पाहण्याचं कुतूहल लोकांमध्ये निर्माण झालंय. पण या बेटाच्या जवळ न जाण्याचं आवाहन लोकांना करण्यात आलंय,कारण यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो तसेच या भागात शार्क आणि स्टिंग रे देखील असल्याने ते हल्ला करू शकतात अशी भितीही व्यक्त केली जातेय. बर्म्युडा ट्रँगलमध्येच  बेट तयार झाल्याची माहिती ‘मेट्रो’नं दिलीय, त्यामुळे याबद्दलचे कुतूहल आणि आकर्षण तेवढंच वाढलं आहे.

वाचा : प्रदूषण रोखणाऱ्या अशा इमारती आपल्याकडंही बांधता येतील का?

अटलांटिक महासागरात बार्बाडोस, फ्लोरीडा आणि प्युर्टो रिकोदरम्यान बर्म्युडा ट्रँगल हा पट्टा येतो. पाच हजार किलोमीटरच्या या पट्ट्यात गेल्या शंभर वर्षात ७५ विमान आणि १०० हून अधिक जहाजं बेपत्ता झाली असून यामध्ये एक हजार जणांचा अद्याप काहीच थांगपत्ता लागू शकलेला नाही. विशेष म्हणजे या विमान किंवा जहाजांचे अवशेषही कधी सापडू शकलेले नाहीत. ऑक्टोबर महिन्यात बर्म्युडा ट्रँगल विषयी रहस्य उघड करण्यात आलं. अटलांटिक महासागरातील या पट्ट्यात षटकोनी ढगांची निर्मिती होऊन एअरबॉम्ब तयार होतात. यासोबत १७० मैल प्रति तास या वेगाने वाहणारे वारेही असतात. या फे-यात अडकून जहाजं बुडू शकतात आणि विमानंही समुद्रात पडण्याची दाट शक्यता असते असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता, पण आता बर्म्युडा ट्रँगल भागात तयार झालेल्या या नवीन बेटामुळे शास्त्रज्ञांना पुन्हा एकदा संभ्रमात टाकले आहे.

वाचा : नवरदेवाचा नागीण डान्स पाहून नवरीनं लग्नच मोडलं

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mystery island appears suddenly in the bermuda triangle nicknamed shelly island by locals

ताज्या बातम्या