नाग-नागिणीची जोडी जेव्हा रोमॅंटिक होते… पाहा हा VIRAL VIDEO

एखाद्या हिंदी चित्रपटात सापांचा सीन पाहतो की काय असा भास हा व्हिडीओ पाहताना होतो. परंतु खर्‍या आयुष्यात असे दृश्य पाहणे दुर्मीळ आहे.

नाग-नागिणीची जोडी जेव्हा रोमॅंटिक होते… पाहा हा VIRAL VIDEO
(Photo: Instagram/ snake._.world)

सोशल मीडियावर दररोज कुठले ना कुठले तरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर जंगलातल्या प्राण्यांचे व्हिडीओ खुप व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन साप एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसून येत आहेत आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अशा प्रकारचे दृश्य फार कमी वेळेला दिसतं.

साप पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेकदा भीती निर्माण होते. पण जर याचऐवजी नाग आणि नागिणीची जोडी एकमेकांना आलिंगन देत प्रेमालाप करताना दिसून आले तर मग हे रोमांचक दृश्य पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक व्हाल. सापांच्या मिलनाचे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असते. पण असे दृश्य क्वचितच पहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच नाग-नागिणीच्या रोमान्सचा व्हिडीओ दाखवणार आहोत. एकमेकांला अलिंगन देत प्रेमात बुडालेले हे दोन साप पाहून पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

आणखी वाचा : २ वर्षाच्या या ऑटिस्टिक मुलाने लाखो लोकांना वेड लावले, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स एकदा पाहाच!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही साप प्रणयक्रीडा करताना दिसून येत आहेत. एका जंगल परिसरात या नाग आणि नागिणीचा रोमान्स सुरू असल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमधील हे नाग-नागिण जवळपास आठ फूट लांबीचे दिसून येत आहेत. दोघेही एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही साप बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात.

आणखी वाचा : जेव्हा नेटकरी म्हणाले, ‘Thor तुझा हातोडा मीराबाई चानूला दे’ , मग Chris Hemsworth ने काय प्रतिक्रिया दिली पाहा…

जंगल परिसरात रोमान्स करणाऱ्या या सापांचं एक अनोख प्रेम पाहायला मिळालं. हे सर्प मिलन कॅमेऱ्यात टिपले गेले आहे. कधी कधी दोघांचे शरीर हवेत हेलकावे खाताना दिसत आहे. एकाच चित्रात दोघांचा प्रणय सुंदर दिसत आहे. हिंदी चित्रपटात सापांचा सीन पाहतो की काय असा भास हा व्हिडीओ पाहताना होतो. परंतु खर्‍या आयुष्यात असे दृश्य पाहणे दुर्मीळ आहे. ते तुम्ही पाहू शकता या व्हिडीओच्या माध्यमातून…

आणखी वाचा : आश्चर्य! पृथ्वीवरील या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही, इथल्या लोकांना अंधारच माहिती नाही, पाहा VIRAL VIDEO

snake._.world नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरू लागला. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बॉयफ्रेंड असावा तर असा…झाडाखाली बसून हे लव्ह बर्ड्स काय करत आहेत? पाहा

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘हेलिकॉप्टर भेळ’ कधी चाखलीय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

सापाबद्दल भारतीय समाजात अनेक अख्यायिक आणि गैरसमज आहेत. नागाकडे नागमणी असतो, नाग इच्छाधारी असतो, सापाची कात घरात ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधरते, नागाच्या एका जोडीदाराला मारल्यास त्याचा जोडीदार बदला घेतो असे अनेक गैरसमज प्रचलित आहेत. इतकेच नाही तर नागाचा प्रणय पाहिल्यास अचानक धनलाभ होतो असाही गैरसमज प्रचलित आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Naag nagin love pranay snake fight animal video viral google trends today snakes were loving each other then suddenly started fighting omg video prp

Next Story
Viral Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पूल-अप्स करून युट्यूबर्सनी रचला वर्ल्ड रेकॉर्ड; व्हिडीओ एकदा पाहाच
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी