Viral Video : दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. पाच दिवसांचा हा सण घरोघरी उत्साह, आनंद, समृ्द्धी आणि चैतन्य घेऊन येतो. या पाच दिवसांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंतचा प्रत्येक दिवस उत्साहाचा असतो. बाहेरगावी नोकरी शिक्षणासाठी गेलेले लोक दिवाळी साजरी करण्यासाठी गावी परतात आणि पाच दिवसांची दिवाळी कुटुंबाबरोबर साजरी करतात आणि भाऊबीजेनंतर पु्न्हा परतीच्या वाटेवर निघतात.
विशेषत: विदर्भ आणि विदर्भातील नागपूर शहरातील तरुण मंडळी मोठ्या प्रमाणावर पुणे मुंबईला जॉब करतात. सध्या असाच एक नागपूरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिवाळी झाली आणि आता परत जाण्याची वेळ आली आहे, असे सांगितले आहे. (Viral Nagpur Video: Time to Return to Mumbai and Pune as Diwali Comes to an End)
नागपूरचा VIDEO व्हायरल
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नागपूरचा रस्ता दिसेल. हा रस्ता रेल्वेस्टेशनकडे जातोय. व्हिडीओवर लिहिलेय, “उठा उठा मंडळी दिवाळी झाली, पुणे मुंबई ला जाण्याची वेळ आली” हा व्हिडीओ पाहून अनेक नागपूरकर तरुण जे पुणे मुंबईला जॉब करतात, ते भावुक होईल. हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे.
हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! बंगल्याबाहेर खास चोरांसाठी लिहली अशी पाटी की…वाचून पोट धरुन हसाल
दिवाळी झाल्यानंतर परत नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाणे, हे खूप कठीण असतं पण जबाबदारीची जाणीव लक्षात घेता अनेक तरुण इच्छा नसतानाही आपले गाव किंवा शहर सोडून पुणे मुंबईला जातात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
हेही वाचा : “आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?
nagpur_xfactor_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही कुठे जात आहात?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणे हे सर्वात चांगले शहर आहे” तर एका युजरने लिहिलेय, “सर्वात वेदनादायी वेळ” आणखी एका युजरने लिहिलेय, “चला पटापट बॅग भरा” काही युजर्नसी मुंबईला जात असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी पुण्याला जात असल्याचे सांगितले आहे.