scorecardresearch

शवपेट्यांच्या जाहिरातीत अर्धनग्न मॉडेल्स, चर्चने व्यक्त केली तीव्र नाराजी

“१२ वेगवेगळ्या शवपेट्या, १२ वेगवेगळ्या मॉडेल्स… हे आता…”

शवपेट्यांच्या जाहिरातीत अर्धनग्न मॉडेल्स, चर्चने व्यक्त केली तीव्र नाराजी
(फोटो Twitter/GotfrydKar वरुन साभार मूळ फोटो kalendarz lindner)

पोलंडमध्ये मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सेवा पुरवणारी कंपनी सध्या टीकेची धनी ठरत आहे. चर्चेने या कंपनीने जाहिरातीसाठी छापलेल्या २०२१ च्या कॅलेंडरवर आक्षेप घेतला आहे. या कॅलेंडरमध्ये काही अर्धनग्नावस्थेमधील मॉडेल्स मयत झाल्यानंतर पार्थव ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शवपेट्या ओढत असल्याचे दाखवण्यात आलं आहे. हे कॅलेंडर म्हणजे मृत व्यक्तींचा अपमान आसल्याचा आक्षेप अनेकांनी नोंदवला आहे.

नक्की वाचा >> PPE सूट फाडून नर्सने करोना रुग्णासोबत केला सेक्स

सालाबादप्रमाणे यंदाही लिंडनेर या कंपनीने आपलं कफीन कॅलेंडर प्रकाशित केलं आहे. या कॅलेंडरमध्ये काही मॉडेल या अंतर्वस्त्रामध्ये शवपेट्या खेचताना दिसत आहेत. पोलंडच्या कंपनीने छापलेलं हे कॅलेंडर आक्षेपार्ह असल्याचं चर्चने म्हटलं आहे. मृत्यू आणि सेक्स या गोष्टींचा असा संबंध जोडण्यात येऊन नये असं चर्चने म्हटल्याचं डेली स्टारने दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे. मात्र कंपनीने आमच्या कंपनीचे उत्पादने म्हणजेच शवपेट्या या कोणीही प्राण सोडण्यास तयार होईल असा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे.

नक्की वाचा >> पारदर्शक PPE किटमध्ये लाँजरी घालून उपचार करणारी नर्स झाली मॉडेल; नोकरीही मिळाली परत

दरवर्षी या कंपनीचं कॅलेंडर वादाचा विषय ठरतं. सर्वात आधी या कंपनीने २०१० साली कॅलेंडर छापलं होतं. त्यानंतर बहुसंख्य जनता ख्रिश्चन धर्मीय असणाऱ्या देशांपैकी अनेक देशांमधील चर्चने या कॅलेंडरचा विरोध केला होता. मृत्यूला अशापद्धतीने अपमानित केलं जाऊ नये. मृत्यूला सन्मान दिलाच गेला पाहिजे अशी भूमिका चर्चेने घेतली होती. मात्र त्यानंतरही दरवर्षी कंपनी अशी वादग्रस्त कॅलेंडर छापत आलेली आहे. कंपनीने २०२१ चेही असे कॅलेंडर छापले असून त्याची जाहिरातही त्यांनी आपल्या वेबसाईटवर केलीय. “१२ वेगवेगळ्या शवपेट्या, १२ वेगवेगळ्या मॉडेल्स… हे आता तुमचं होऊ शकतं,” अशी या १२ महिन्यांसाठी वेगवेगळ्या मॉडेल्सचे फोटो असणाऱ्या कॅलेंडरच्या जाहिरातीत म्हटलं आहे. ही जाहिरात कंपनीने आपल्या वेबसाईटवर केलीय.

कंपनीने तयार केलेल्या यंदाच्या कॅलेंडरमध्येही १२ वेगवेगळ्या मॉडेल्स या १२ वेगवेगळ्या शवपेट्यांसोबत असून प्रत्येक महिन्यामधील दिवस आणि कालावधीचा विचार करुन त्याप्रमाणे कॅलेंडरची मांडणी करण्यात आली आहे. २०२१ साठी तयार करण्यात आलेली सर्व कॅलेंडर विकली गेली असल्याचं कंपनीने आपल्या वेबसाईटवर म्हटलं आहे. त्यामुळेच एकीकडे या कॅलेंडरवरुन वाद होत असतानाच त्यांची मागणीही तितकीच असल्याचे स्पष्ट होत आहे.

नक्की वाचा >> लॉकडाउनचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारला छापा; घरात ५० जण करत होते Sex Party

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2021 at 16:10 IST

संबंधित बातम्या