नमकीन विकणाऱ्याचा हटके अंदाज पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन | Loksatta

नमकीन विकणाऱ्याचा हटके अंदाज पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन

हा व्हायरल व्हिडीओ भोपाळचा असून लोकांना तो खूप आवडला आहे.

नमकीन विकणाऱ्याचा हटके अंदाज पाहिला का? Viral Video पाहून तुम्हीही व्हाल त्याचे फॅन
हा व्हायरल व्हिडीओ भोपाळचा असून लोकांना तो खूप आवडला आहे. (Twitter)

सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे. हे माध्यम कधी कोणाला स्टार बनवेल आणि कधी कोणाला जमिनीवर आणेल हे सांगता येणे कठीण आहे. सोशल मीडियामुळे बऱ्याच सामान्य माणसांचे दिवस रातोरात बदलले. याच उदाहरण म्हणजे रानू मोंडल किंवा कच्चा बदाम गाणं गाणारा फेरीवाला माणूस. एका व्हिडीओमुळे या दोघांचेही नशीब पलटले. यानंतर आणखी काही व्हिडीओ आले ज्यात भाजी विकण्याची स्टाइल वेगळी होती तर काहींची फळे विकण्याची पद्धत अनोखी होती.

दरम्यान, आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यावेळी हा विक्रेता नमकीन विकत आहे. हा व्हायरल व्हिडीओ भोपाळचा असून लोकांना तो खूप आवडला आहे. हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे, ‘भोपाळी नमकीन वाला… भोपाळमध्ये टॅलेंटची कमी नाही…’

गच्च भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याला गेटवर लटकून करावा लागत होता प्रवास, अचानक हात सुटला आणि…; पाहा धक्कादायक VIDEO

४५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही एका वृद्ध विक्रेत्याला एका जुन्या स्कूटरवर बॅग घेऊन बसलेले पाहू शकता. अगदी तरुणाप्रमाणेच त्यांनी बॉय असे लिहिलेली टोपी घातली आहे. ते नमकीन विकायला आले आहेत. मात्र ज्या पद्धतीने ते नमकीन विकत आहेत ती पद्धत कमाल आहे. ते गात आहे आणि गाता गाता ग्राहकांना त्यांच्या नमकीनची किंमत काय आहे हे सांगत आहे.

लाइव्ह कार्यक्रमातच मांजरीने पत्रकाराला मारली कानाखाली; हा Viral Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याला २ हजाराहून अधिक लोकांनी लाइक केले आहे, तर ४५० पेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. आतापर्यंत हा विडिओ ९३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-09-2022 at 19:10 IST
Next Story
पंचविशीतील ‘या’ अभिनेत्रीला काकू हाक मारताच होतो आनंद? ‘भाग्य दिले तू मला’ मधील अभिनेत्याने सांगितले गुपित