Nana Patekar Song Viral Reel: सोशल मीडियावर सध्या नाना पाटेकरांचं जुनं आणि भन्नाट गाणं पुन्हा ट्रेंडमध्ये आलं आहे. ‘मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या थ्रू, त्या दिवशी झाला फिव्हर सुरू… कधी १०० १, कधी १०० २’ या मजेशीर गाण्यावर अनेक जण रील्स बनवताना दिसत आहेत. आता याच ट्रेंडिंग गाण्यावर केलेला एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
Instagramवर शेअर करण्यात आलेल्या या रीलमध्ये या लोकप्रिय गाण्याच्या तालावर उत्साहात डान्स करताना पाहायला मिळतं. गाण्याची मजेशीर लय, भन्नाट शब्द आणि त्यावर केलेल्या डान्स स्टेप्स यामुळे हा व्हिडीओ लक्षवेधी ठरला आहे.
नाना पाटेकरांचं गाणं पुन्हा चर्चेत
नाना पाटेकर यांच्या अंदाजाशी जोडलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर नव्या पिढीलाही आकर्षित करत आहे. जुन्या गाण्यांवर नवे ट्रेंड तयार होण्याचं प्रमाण Instagramवर वाढलं असून, त्यात या गाण्याचीही भर पडली आहे.
‘मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या थ्रू…’ या ओळी आणि त्यानंतर येणारा ‘फिव्हर’चा मजेशीर संदर्भ रीलसाठी चांगलाच वापरला जात आहे. त्यामुळे हे गाणं पुन्हा एकदा सोशल मीडिया यूजर्सच्या प्लेलिस्टमध्ये आणि रील्समध्ये दिसू लागलं आहे.
‘हा ट्रेंड चुकवायचा कसा?’
या डान्स रीलला सोशल मीडिया युजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गाण्याचा मजेशीर अंदाज आणि त्यावर केलेला उत्साही डान्स यामुळे व्हिडीओने लक्ष वेधून घेतलं आहे. जुन्या गाण्यांना सोशल मीडियावर नवा ट्रेंड मिळतो आणि काही क्षणांत ती गाणी पुन्हा चर्चेत येतात. नाना पाटेकरांचं हे गाणंही सध्या अशाच ट्रेंडचा भाग बनलं आहे.
