Premium

नरेंद्र मोदींनी ‘७५ हार्ड डे’ चॅलेंज फेम अंकितची घेतली भेट; इन्फ्लूएंसरने पंतप्रधानांना सांगितला फिटनेस प्लॅन

Swachhta Hi Seva: व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, मोदी अंकितला स्वच्छता मिशनमुळे त्याच्या फिटनेसला कशी मदत झाली, असे विचारतात. त्यावर अंकित उत्तर देतो..

Narendra Modi Ankita Baiyanpuriya Meet Before Mahatma Gandhi Birth Anniversary Swachhta Hi Seva Modi asks 75 hard Plan
नरेंद्र मोदी व अंकितची ग्रेट भेट (फोटो: ट्विटर)

Narendra Modi & Ankita Baiyanpuriya Meet: महात्मा गांधी जयंतीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १ ऑक्टोबरला ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना आवाहन केले होते. आज या दिवशी पंतप्रधान मोदींनी अंकित बैयनपुरिया या फिटनेस इन्फ्लुएन्सरची भेट घेतली. ७५ हार्ड चॅलेंजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेल्या अंकितसह व्हिडीओ पोस्ट करून मोदींनी त्याचे कौतुक केले. मोदींनी लिहिले की, “आज, जेव्हा देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे, तेव्हा अंकित बैयनपुरिया आणि मी सुद्धा यात सहभागी होत आहोत. फक्त स्वच्छतेच्या पलीकडे, आम्ही शारीरिक व मानसिक तंदरुस्तीला सुद्धा यात महत्त्वाचे स्थान देत आहोत. ही स्वस्थ व स्वच्छ भारतासाठीची मोहीम आहे”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता, मोदी अंकितला स्वच्छता मिशनमुळे त्याच्या फिटनेसला कशी मदत झाली, असे विचारतात. त्यावर अंकित उत्तर देतो, “आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. जर आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ राहिला तरच आपण तंदुरुस्त राहू. सोनीपतच्या लोकांनी स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे, असेही अंकित म्हणाला.”

Video: नरेंद्र मोदी व अंकितची ग्रेट भेट

नरेंद्र मोदी यांनी अंकितला त्याच्या ७५ डे हार्ड चॅलेंजविषयी सुद्धा माहिती विचारली होती. ज्यावर उत्तर देताना अंकितने आपले ७५ हार्ड डे चॅलेंज सविस्तर उलगडून सांगितले होते.

काय आहे ७५ हार्ड डे चॅलेंज? (What is 75 Hard Day Challenge)

७५ हार्ड या चॅलेंजमध्ये पाच लक्षवेधी मुद्दे किंबहुना नियम असतात ज्याचे पालन ७५ दिवसांसाठी करणे आवश्यक असते. सर्वात आधी हे पाच नियम काय आहेत हे जाणून घेऊया..

  • मद्यपान आणि जंक फूड बंद
  • दररोज दोन वेळा ४५ -मिनिटांचे वर्कआउट पूर्ण करा, त्यापैकी एक हे घराबाहेर असणे आवश्यक आहे.
  • दररोज तीन ते चार लिटर पाणी प्या.
  • दररोज शैक्षणिक किंवा व्यक्तिमत्व विकासासाठी पुस्तकाचे १० पाने वाचा.
  • दररोज एक सेल्फी घ्या जेणेकरून तुम्हाला चॅलेंजच्या शेवटी स्वतःमधील बदल नीट पाहता येईल.
  • या नियमांसह आणखी एक मोठा व महत्त्वाचा भाग म्हणजे यातील एकही गोष्ट जर तुमच्याकडून चुकली किंवा राहून गेली तर आपल्याला पूर्ण चॅलेंज पहिल्यापासून पुन्हा सुरु करावे लागते.

हे ही वाचा<< राम राम भाई सारेयाने.. म्हणत हिट झालेलं ‘७५ हार्ड’ चॅलेंज काय आहे? तुम्ही ‘हे’ पाच नियम पाळू शकता का?

दरम्यान, मन की बातच्या १०५ व्या भागादरम्यान मोदी यांनी १ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता एका तासासाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील कोट्यावधी नागरिकांनी सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Narendra modi ankita baiyanpuriya meet before mahatma gandhi birth anniversary swachhta hi seva modi asks 75 hard plan svs

First published on: 01-10-2023 at 14:58 IST
Next Story
Video: प्राणीप्रेमी! श्वान जोडप्याचे थाटामाटात केले ‘डोहाळजेवण’