Narendra Modi EVM Video Fact Check : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. त्यात एकट्या भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला मात्र फक्त ४६ जागांवर विजय मिळवता आला. महाराष्ट्रातील हे निकाल पाहता, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांतील नेते निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम मशीनविरोधात प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. एकीकडे या राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असल्याचे लाईटहाऊस जर्नालिझला आढळून आले. हा व्हिडीओ पोस्ट करीत युजरने दावा केला, “हा व्हिडीओ जुना आहे आणि २०१४ पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM)वर नाही, तर बॅलेट पेपरवर घ्याव्यात; परंतु भाजपा आता ईव्हीएमचा बचाव करत आहे.” पण खरंच पंतप्रधान मोदींनी असे कोणते विधान केलेय का, याविषयीचे सत्य आपण जाणून घेऊ…

नेमका कोणता व्हिडीओ होतोय व्हायरल?

एक्स युजर सुरभीने तिच्या प्रोफाईलवर व्हिडीओ शेअर केला आहे.

What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Maharashtra assembly election 2024
लालकिल्ला: शेवटच्या आठवड्यातील प्रचाराने लाभ कोणाला?
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
cm Eknath shinde loksatta interview
खोटे कथानक निवडणुकीत चालणार नाही!

इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

रिव्हर्स इमेज सर्च आणि गुगल की-वर्ड सर्चचा वापर करून आम्ही आमचा तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला वनइंडिया न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

हेही वाचा – रिक्षासमोर उभी असलेली ‘ती’ व्यक्ती खरंच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत का? वाचा व्हायरल Photo मागची सत्य बाजू

या व्हिडीओमध्ये सुमारे ३५ मिनिटे १४ सेकंदे या वेळेदरम्यान पंतप्रधान मोदी व्हायरल व्हिडीओमधील विधानासारखेच विधान करताना दिसत आहेत. यात मोदी असे म्हणताना ऐकू येतेय, “काही लोक म्हणतात आमचा देश गरीब आहे. लोक निरक्षर आहेत. पण, बंधू आणि भगिनींनो, जगातील बहुतेक विकसित देश आजही त्यांच्या निवडणुकांमध्ये बॅलेट पेपरचा वापर करतात. पण हा असा भारत आहे; ज्याला तुम्ही गरीब आणि निरक्षर म्हणता, तो आज बटण दाबून मतदान करत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडीओ आम्हाला सापडला.

हा व्हिडीओ ३ डिसेंबर २०१६ रोजी अपलोड करण्यात आला होता. जेव्हा नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे भारतीय जनता पार्टीदरम्यान परिवर्तन यात्रेदरम्यान संबोधित केले होते.

आम्हाला भाजपच्या वेबसाइटवर कार्यक्रमाची एक प्रेस नोटदेखील सापडली.

https://www.bjp.org/pressreleases/paradhaanamantarai-sarai-naraenadara-maodai-davaaraa-utatara-paradaesa-kae-0

आम्हाला त्याचसंदर्भात काही बातम्या आढळल्या.

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/go-digital-even-beggar-using-swipe-machine-pm-narendra-modi/articleshow/55773596.cms?from=mdr
https://timesofindia.indiatimes.com/city/bareilly/moradabad-turns-fortress-for-pm-modis-parivartan-yatra-today/articleshow/55758184.cms

निष्कर्ष :

२०१६ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EVM बद्दल विधान केले होते; ज्याचा जुना व्हिडीओ एडिट करून, आता दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची कोणतीही मागणी केली नव्हती.