Nasa Artificial Gravity Bed Rest Experiment: जगभरामध्ये लोक उदरनिर्वाह करण्याचा नानाविध प्रकाराचे उद्योग करत असतात. व्यवसाय चालवणारे आणि नोकरी करणारे या दोन गटांमध्ये लोक विभागलेले आहेत. यातील नोकरी करणाऱ्या गटामधील सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचा गट काहीसा संतृष्ट आणि आर्थिकरित्या स्थिर स्वरुपाचा आहे. याउलट खासगी पद्धतीने काम करणारे लोक काहीसे असमाधानी आहेत असे चित्र पाहायला मिळते. या गटातील सदस्य सतत काम करत असतात. यामुळे त्यांना ज्या ठिकाणी ताणतणाव असणार नाही, कामावरुन बॉसची बोलणी खावी लागणार नाही अशा प्रकारच्या नोकरीच्या शोधात असतात. त्यातही काहीजण काम कमी आणि पैसे जास्त मिळावेत अशी अपेक्षा करत असतात. अशाच एका आरामदायी नोकरीविषयीची माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहेत.

NASA देणार झोपायचे पैसे ?

नासा (Nasa) म्हणजेच ‘नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस एजन्सी’ या अमेरिकन संस्थेमध्ये भरती सुरु झाली आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना झोपायचे पैसे मिळणार आहे. नासासंबंधित ही गोष्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामुळे लोकांची या नोकरीबद्दलची उत्सुकता वाढली आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचे जर्मन एरोस्पेस सेंटर मिळून बऱ्याच काळापासून कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्टसंबंधित संशोधन करत आहे. त्यांच्या या प्रयोगामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना महिन्याला १३ ते १४ लाख रुपये दिले जातात असे म्हटले जात आहे.

indian Institute of technology students package drastically reduced due to global economic slowdown
गलेलठ्ठ वेतनाच्या ‘आयआयटी’च्या ऐटीला तडा
MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Loksatta anvyarth Institute like IIT Mumbai has very less campus placement figures for recruitment
अन्वयार्थ: ‘आयआयटी’चे रोजगारवास्तव

नासाच्या संशोधनातील प्रयोगामध्ये व्यक्तीला बेडवर झोपवले जाते आणि त्याच्या शरीराचा अभ्यास केला जातो. एका जागी दिवसरात्र झोपून राहिल्यावर मानवी शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात याबद्दल शास्त्रज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅन्ड स्पेस एजन्सी या अमेरिकन संस्थेद्वारे सदर प्रयोगामध्ये याआधीही अनेकजण सहभागी झाले आहेत. या प्रयोगामध्ये सहभाग घेणाऱ्यांना दोन महिने शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली राहावे लागते.

आणखी वाचा – मी झोपलेलो नाही तर…नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना यांचा मजेदार खुलासा, फोटो व्हायरल

सोशल मीडियावर आहे नोकरीची चर्चा

अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, नासाच्या कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्ट प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या लोकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल १८ हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १४ लाख रुपये दिले जातात. म्हणजे त्यातील एका व्यक्तीवर एका महिन्यात ७ लाख रुपये खर्च केले जातात. दरम्यान ही गोष्ट खरी आहे की खोटी याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. काहीजणांनी ही गोष्ट खोटी, नकली असल्याचेही म्हटले आहे.