scorecardresearch

Premium

Video : “पडद्यामागे शांतपणे काम….” कर्तव्यदक्ष पोलिसाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल सलाम!

सध्या नाशिक पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहून तुम्हीही पोलिसांच्या कार्याला सलाम कराल.

nashik a dutiful policeman had lunch on a bike by keeping a box netizens salute to the officer video viral
Video : "पडद्यामागे शांतपणे काम…." कर्तव्यदक्ष पोलिसाचा 'तो' व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल सलाम (photo – @nashikpolice twitter)

Policeman Eating On Bike Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तुम्हाला हसवतात; तर काही तुमच्या डोळ्यांत पाणी आणतात. सोशल मीडियावर तुम्ही राज्यातील पोलिसांच्या अनेक पोस्ट्स अनेकदा पाहिल्या असतील. पोलिस अनेकदा त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून लोकांना विविध सुरक्षा नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून देत असतात. सध्या नाशिक पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे; जो पाहून तुम्हीही पोलिसांच्या कार्याला सलाम कराल.

नाशिकमधील एका पोलिस कर्मचाऱ्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आपल्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत ते नागरिकांच्या मदतीसाठी धावून येतात. त्यांच्यामुळे तुम्ही घरात सुरक्षित राहू शकता; पण काही वेळा त्यांच्याकडे उदरभरणासाठीही फारसा वेळ नसतो. त्यामुळे मिळेत त्या जागी उभे राहून काही वेळा ते डबा खातात. अशा प्रकारे एक पोलिस कर्मचारी भररस्त्यात बाइकवर डबा ठेवून जेवत आहे.

PM Narendra Modi
”नव्या सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलासाठी ८०० कोटी मंजूर”, मोदी म्हणाले, ”नवीन संसद भवनाप्रमाणे…”
pimpri Criminals pistols
पिंपरीत ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; दरोडा विरोधी पथकाची कारवाई
ayushmann-khurrana-viral-video
आयुष्मान खुरानाचा ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय? जाणून घ्या
Rohit Pawar ED
रोहित पवारांची ११ तासांनंतर ईडी चौकशी संपली; कार्यालयाबाहेर येताच म्हणाले, “जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत येतो…”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिस कर्मचारी रस्त्याच्या कडेला बाइकवर डबा ठेवून उभ्याने जेवत आहे. नाशिक पोलिसांनी आपल्या एक्स ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ पोस्ट करीत लिहिलेय की, आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम!

दरम्यान, नेटकरीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत पोलिस कर्मचाऱ्याला सलाम करीत आहेत. तर, काही युजर्सनी पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nashik a dutiful policeman had lunch on a bike by keeping a box netizens salute to the officer video viral sjr

First published on: 04-12-2023 at 15:14 IST

संबंधित बातम्या

×