scorecardresearch

Premium

Nauvari Rap Video: Hustle गाजवणारी ‘ही’ विदर्भाची पोट्टी आहे कोण? नऊवारी व नथ घालून हिप हॉपला दिला तडका

Nauvari Rap Viral Video Girl: आर्याच्या अस्सल महाराष्ट्री पेहरावाने व त्याहूनही तिच्या स्पष्ट शब्दांनी तिने सर्वांचं मन जिंकलं आहे.

Nauvari Rap Viral Video
Nauvari Rap Viral Video (फोटो: इंस्टाग्राम/ AaryaJadhavQK)

Nauvari Rap Viral Video: हिप हॉप किंवा रॅप म्हंटलं की डोळ्यासमोर काय येतं? अंगापेक्षा भोंगा मोठा वाटावी अशी स्टाईल.. अगदी चार माप मोठं टीशर्ट, गुडघ्यापर्यंत आलेली जीन्स, फंकी शूज गळ्यात चांदीच्या चैन. पण मागील काही काळात या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. रफ्तार, राजाकुमारी यांसारख्या कलाकारांनी रॅपिंग व हिप हॉपची संस्कृती शाब्दिक जादूने बदलली आहे. अशातच आता या क्षेत्रात एका मराठमोळ्या तरुणीने सर्वांना वेड लावलंय. अमरावतीची आर्या जाधाव अलीकडेच MTV या वाहिनीवरील Hustle २.o या कार्यक्रमात दिसून आली. यावेळी तिने चक्क मराठीत रॅप सादर केला. यापूर्वीही अनेक मराठी रॅप टिकटॉक किंवा इंस्टाग्रामवर व्हायरल झाले होते मात्र आर्याच्या अस्सल महाराष्ट्री पेहरावाने व त्याहूनही तिच्या स्पष्ट शब्दांनी तिने सर्वांचं मन जिंकलं आहे. पण ही तरुणी नेमकी आहे कोण? चला तर पाहुयात…

मराठी नऊवारी रॅप का होतोय Viral?

हसल २.० मध्ये नऊवारी नेसून आर्या जाधव जेव्हा स्टेजवर आली तेव्हा सर्वचजण थक्क झाले होते. नऊवारी, मोकळे केस, नाकात नथ व चंद्रकोर आणि त्याला फ्युजनचा तडका देण्यासाठी पायात शूज असा भन्नाट लुक घेऊन आर्या आली आणि तिने खरोखरच स्टेजसह प्रेक्षकांनाही जिंकून घेतलं. मराठी रॅप म्हणजे पुन्हा काहीतरी चार यमक जुळवून जोरात पाय आदळून नाचून दाखवणार असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हायरल व्हिडीओ तुमचं मत नक्कीच बदलेल. आर्याने केलेली शब्दांची गुंफण इतकी सुंदर होती की बादशाह सुद्धा तिचं कौतुक करताना स्वतःला थांबवू शकला नाही.

jitendra awhad on ncr hearing election commission
“…आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं”, जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट; म्हणाले, “..ते पाहाणं दु:खदायक होतं!”
namrata sambherao shared photo with vanita kharat and onkar bhojane
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, वनिता खरात आणि ओंकार भोजने पुन्हा एकत्र, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष
manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Manoj Jarange
Maharashtra News : “तर आपली सोयरीक मोडलीच म्हणून समजा”, उपोषण मागे घेण्याची तयारी दाखवत जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

नऊवारीत रॅप करणारी तरुणी आहे कोण?

आर्या जाधव ही मूळची अमरावतीची आहे. करोना काळात घरीच असताना तिला एक दिवस रॅपची कल्पना सुचली. घराच्या छतावर बसून तिने रॅप लिहायला सुरुवात केली. हळूहळू मोबाईलवर शूट करून ती आपल्या सोशल मीडियावर हे व्हिडीओ शेअर करू लागली. QK या नावाने तिने आपले युट्युब चॅनेलही सुरु केले. Hustle च्या माध्यमातून आता आर्य घरोघरी पोहचली आहे. हिप हॉप म्हणजे धांगडधिंगा नसून त्याला आपलंस करण्यासाठी तिने नऊवारी नेसून सादरीकरण केल्याचं सांगितलं होतं.

मराठी नऊवारी रॅप Hustle Viral Video

ड्रॉप इट द्रौपदी रॅप

आर्याने QK नाव का निवडलं?

दरम्यान, आर्या सध्या स्पर्धेत एकापेक्षा एक रॅप सादर करत आहे. आर्या सध्या Dee MC च्या टीमचा भाग आहे. यापुढील भागांमध्येही ती नक्कीच कमाल करून दाखवेल असा विश्वास हसलच्या सर्व परीक्षकांनी तिच्यावर दाखवला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nauvari rap viral video mtv hustle 2 0 amravati girl aarya jadhav instagram hip hop svs

First published on: 24-09-2022 at 13:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×