Python Swallowed Duck Video Viral : साप किंवा अजगराचे नाव घेतले तरी अंगावर काटा उभा राहतो. पण, पावसाळ्यात हमखास या प्राण्यांचे दर्शन घडते. सोशल मीडियावरही अजगर, सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. यात प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ अनेक असतात. सध्या अशाचप्रकारे एक अजगराचा शिकारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अजगर एका बदकाची इतक्या क्रूरपणे शिकार करतोय की पाहून थरकाप उडेल. या शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
अजगर हा कोणत्याही प्राण्यावर थेट हल्ला न करता तो आधी शिकारीला विळख्यात घट्ट आवळून त्याचा जीव घेतो. यानंतर तो त्या प्राण्याला अख्खा गिळतो. व्हायरल व्हिडीओतही अजगर बदकाला जीवे ठार मारून नंतर अख्खा गिळताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहताना इतका भयानक वाटतोय की तुम्हालाही घाम फुटेल.
आतापर्यंत तुम्ही अजगराला शिकार करताना पाहिलं असेल, तो शिकार गिळताना प्रथमच पाहत असाल, या व्हिडीओतही असेच काहीसे दृश्य दिसतेय. हा व्हिडीओ नवी मुंबईतील असल्याचे सांगितले जात आहे.
अजगराने बदकाचा जीव घेत अख्ख गिळलं
बदकाच्या मानेवर केला गंभीर हल्ला
व्हिडीओत पाहू शकता की, मानवी वस्ती असलेल्या भागात अजगर शिरला आहे. यानंतर त्याने तिथल्या विहिरीजवळ बसलेल्या एका बदकावर हल्ला केला. बदकाच्या मानेवर गंभीर हल्ला करून आधी त्याने त्याचा जीव घेतला, नंतर मेलेल्या बदकाला तसंच अख्खं गिळलं व बदकाला गिळल्यानंतर शांतपणे पडून राहिला.
त्याचवेळी रेस्क्यू टीमने धाव घेत त्या मृत बदकाला अजगराच्या तोंडातून बाहेर काढले. त्यानंतर अजगराला रेस्क्यू करून घेऊन गेले.
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा अजगराला धोका वाटतो किंवा तो तणावाखाली असतो तेव्हा तो गिळलेली शिकार अशाप्रकारे तोंडावाटे बाहेर काढतो, जेणेकरून तो सहज पळून जाऊ शकेल. दरम्यान, अशीच घटना या अजगरासह घडली. अखेर अजगराने शिकार बाहेर फेकताच बचाव पथकाने त्याला इजा न करता जंगलात नेऊन सोडले.
अजगराचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ @sarpmitr_ashtvinayak_more’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हे दृश्य फार भयानक आणि धडकी भरवणारे असल्याचे म्हटले आहे.
