वाहन चालवताना लोकांना अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. त्यामध्ये हेल्मेट घालणे, दुचाकीवरुन एकावेळी दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास न करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन काळजीपूर्वक आणि कमी वेगात चालवण्याचा सल्ला पोलिसांकडून सतत दिला जातो. मात्र, पोलिसांनी आवाहन करुनही अनेकजण वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने वाहन पळवताना दिसतात. वाहतुकूचे नियम मोडणाऱ्यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय असे लोक स्वतःचा आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात घालत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चार मुली एका स्कूटीवरुन भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचे सांगितलं जात आहे, व्हिडीओमध्ये चार मुली भरधाव वेगाने जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्या हेल्मेटशिवाय स्कूटी चालवत आहेत. इतकच नव्हे तर पुढे बसलेली मुलगी स्कूटी चालवत नसून तिच्या मागे बसलेली मुलगी स्कूटी चालवत आहे. मुलींचा जीवघेणा स्टंट एका कारचालकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्कूटीवर बसलेल्या ४ मुली हवेच्या गतीने स्कूटी चालवताना दिसत आहेत. यादरम्यान मुली सेल्फी आणि व्हिडिओही काढत असल्याचं दिसत आहे.

Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
bengaluru woman online fraud case
महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!
tiger unexpectedly came out of bushes jumped on cow
जंगल सफारीचा आनंद घेत होते पर्यटक, अचानक झुडपातून बाहेर आला वाघ, उडी मारून….पुढे काय घडले ते व्हिडीओमध्ये बघा
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

हेही पाहा- Video: वाहन चालकांना शिवीगाळ, कारच्या बोनेटवर डान्स; प्रेमात फसवणूक झाली म्हणून तरुणीचा भररस्त्यात राडा

हेही पाहा- Pakistani Elon Musk: पाकिस्तानमध्ये फळ खरेदी करताना दिसला एलॉन मस्क! हा व्हायरल फोटो पाहिलात का?

मुलींचा हा ७ सेकंदांचा व्हिडीओ @RupaliVKSharma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुमच्या माहितीसाठी, ४ मुली वाशीच्या पाल्म बीच रोडवर स्कूटीवरून हेल्मेटशिवाय प्रवास करत होत्या. या वेळी त्या व्हिडिओ आणि सेल्फीदेखील काढत होत्या. मजा करणे ही एक गोष्ट वेगळी आहे, परंतु त्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखं कृत्य करत आहेत. तरुण मुलांना अधिक जागरूकतेची आवश्यक आहे. जास्तीचा दंड केला तरच अशा घटना कमी होण्यास मदत होईल.’

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी स्कूटी चालवणाऱ्या मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. शिवाय व्हिडीओत स्कूटीचा नंबर दिसत नसल्याचंही पोलिसांनी ट्विटच्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत असून अशाप्रकारे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. तर एका व्यक्तीने हे खूपच धोकादायक आणि जीवघेणं असल्याचं म्हटलं आहे.