विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन ४ मुलींचा जीवघेणा प्रवास; भरधाव वेगात सेल्फी काढतानाचा Video पाहून नेटकरी संतापले

स्कुटीवरील ४ मुलींचा जीवघेणा स्टंट एका कारचालकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे.

4 Girls Riding on Single Scooter
लोकांना अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. (Photo : Twitter)

वाहन चालवताना लोकांना अनेकदा वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते. त्यामध्ये हेल्मेट घालणे, दुचाकीवरुन एकावेळी दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास न करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहन काळजीपूर्वक आणि कमी वेगात चालवण्याचा सल्ला पोलिसांकडून सतत दिला जातो. मात्र, पोलिसांनी आवाहन करुनही अनेकजण वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने वाहन पळवताना दिसतात. वाहतुकूचे नियम मोडणाऱ्यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय असे लोक स्वतःचा आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांचाही जीव धोक्यात घालत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चार मुली एका स्कूटीवरुन भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुंबईतील असल्याचे सांगितलं जात आहे, व्हिडीओमध्ये चार मुली भरधाव वेगाने जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्या हेल्मेटशिवाय स्कूटी चालवत आहेत. इतकच नव्हे तर पुढे बसलेली मुलगी स्कूटी चालवत नसून तिच्या मागे बसलेली मुलगी स्कूटी चालवत आहे. मुलींचा जीवघेणा स्टंट एका कारचालकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये स्कूटीवर बसलेल्या ४ मुली हवेच्या गतीने स्कूटी चालवताना दिसत आहेत. यादरम्यान मुली सेल्फी आणि व्हिडिओही काढत असल्याचं दिसत आहे.

हेही पाहा- Video: वाहन चालकांना शिवीगाळ, कारच्या बोनेटवर डान्स; प्रेमात फसवणूक झाली म्हणून तरुणीचा भररस्त्यात राडा

हेही पाहा- Pakistani Elon Musk: पाकिस्तानमध्ये फळ खरेदी करताना दिसला एलॉन मस्क! हा व्हायरल फोटो पाहिलात का?

मुलींचा हा ७ सेकंदांचा व्हिडीओ @RupaliVKSharma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुमच्या माहितीसाठी, ४ मुली वाशीच्या पाल्म बीच रोडवर स्कूटीवरून हेल्मेटशिवाय प्रवास करत होत्या. या वेळी त्या व्हिडिओ आणि सेल्फीदेखील काढत होत्या. मजा करणे ही एक गोष्ट वेगळी आहे, परंतु त्या अपघाताला आमंत्रण देण्यासारखं कृत्य करत आहेत. तरुण मुलांना अधिक जागरूकतेची आवश्यक आहे. जास्तीचा दंड केला तरच अशा घटना कमी होण्यास मदत होईल.’

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी स्कूटी चालवणाऱ्या मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. शिवाय व्हिडीओत स्कूटीचा नंबर दिसत नसल्याचंही पोलिसांनी ट्विटच्या कमेंटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत असून अशाप्रकारे वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ते करत आहेत. तर एका व्यक्तीने हे खूपच धोकादायक आणि जीवघेणं असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 12:50 IST
Next Story
AI च्या मदतीने ११ वर्षांच्या भारतीय मुलीने तयार केले Eye disease detection app; नेटिझन्स म्हणाले…
Exit mobile version