“तो निर्णय वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी…”; पत्नीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट, कारण…

रोहित पवारांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Rohit and kunti Pawar
(फोटो: @RRPSpeaks / Twitter)

रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. रोहित पवार (Rohit Pawar) सोशल मीडियावरही चांगलेचं सक्रीय असतात. ते त्यांच्या कामाबद्दल, मतदारसंघातील लोकांबद्दल, आणि अन्य अनेक गोष्टींबद्दलची माहिती सोशल मीडियावरून (Social Media) सगळ्यांपर्यंत पोहचवत असतात. यासोबतच ते त्यांच्या आयुष्यातील अनेक खास दिवस, क्षणही शेअर करत असतात. अशीच त्यांची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे जी त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बायकोसाठी अर्थात कुंती पवार (Kunti Pawar) यांच्यासाठी लिहिली आहे.

काय आहे पोस्ट?

आपल्या सोशल मीडियावर रोहित पवार लिहतात ” प्रिय कुंती! #HappyAnniversary माझ्या आयुष्यात ज्या दोन महिलांचा प्रभाव आहे, त्यात आई आणि तू आहेस. तुझी साथ तर फार मोलाची आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात तू खंबीरपणे पाठीशी असतेस. उच्चशिक्षित असूनही स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून मुलं मोठी होईपर्यंत गृहिणी म्हणून काम करायचं तू ठरवलं.”

(हे ही वाचा: मेंदूला मार लागलेल्या ऊसतोड मजूराच्या मुलाचा रोहित पवारांनी वाचवला जीव)

पुढे ते लिहतात, ” मी सार्वजनिक जीवनात असल्याने मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही, म्हणून तू स्वतःहून हा निर्णय घेतलास. तो वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र किती अवघड आहे, याची मला जाणीव आहे. म्हणूनच माझ्या आयुष्यात तुझं स्थान नेहमीच खास आणि विशेष असं आहे आणि ते नेहमीच तसं राहील.”

(हे ही वाचा: प्रेरणादायी! ५ कंपन्यांमधील डिलिव्हरी बॉय ते सॉफ्टवेअर इंजिनीअर… घरोघरी ऑर्डर पोहोचवतानाच शिकला कोडिंग)

(हे ही वाचा: Video: शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग; राज्य शासनाचा पुरस्कारही पटकावला)

रोहित पवार आणि कुंती पवार यांच्या लग्नाला आज २९ मे रोजी आज १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास दिवशी रोहित पवारांनी आपल्या बायकोचे आभार देखील मानले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp mla rohit pawar sharad special post for wife kunti on wedding anniversary ttg

Next Story
चक्क पोपटाने महिलेला ‘आई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली, दोघांमधील संभाषणाचा हा VIDEO VIRAL
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी