Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या घटना व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुलावरून नदीत उडी मारणाऱ्या एका तरुणीला एनडीआरएफ टीम वाचवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (ndrf team saved a girl who was trying to commit suicide shocking video goes viral)

आत्महत्या करत होती तरुणी, एनडीआरफ टीमने वाचवला जीव

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी पुलाच्या खांब्यावर बसलेली दिसत आहे. ती आत्महत्या करण्याच्या विचार करत आहे पण वेळीच एनडीआरएफ टीम येते आणि त्यातील एक जवान तरुणीचे दोन्ही हात घट्ट पकडतो पण ती हात सोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा दुसरा जवान येतो आणि त्या तरुणीला उचलतो. दोन्ही जवानाच्या मदतीने त्या तरुणीला पुलाच्या खांब्यावरून बाजूला केले जाते. अशा प्रकारे त्या तरुणीला आत्महत्या करण्यापासून वाचवले जाते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

हेही वाचा : ही कला फक्त महाराष्ट्रात दिसणार! वारकऱ्याने वाजवली अफलातून ढोलकी, सर्व पाहतच राहिले.. VIDEO होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

commando_soldier_army या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावा ही तरुणी ट्रेन पुलवरून आपले आयुष्य संपवण्याचा विचार करत होती. कोणीतरी पाहिले आणि कॉल केला तेव्हा एनडीआरफ टीमने तिचे आयुष्य वाचवले.”

हेही वाचा : ‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे खरे सुपरहिरो आहेत” तर एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद, त्या मुलीचे आयुष्य वाचवल्याबद्दल” आणखी एका युजरने लिहिलेय, “लोक आत्महत्या करण्याचा विचार का करतात?” एक युजर लिहितो, “आत्महत्या हा पर्याय नाही” तर एक युजर लिहितो, “जगात अशी कोणतीच समस्या नाही जी तुम्ही सोडवू शकत नाही त्यामुळे मरायचा विचार कधीही करू नये. शेवटी आयुष्य एकदाच मिळतं” या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक युजर्सनी एनडीआरएफ टीमचे कौतुक केले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधीचा आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader