…अन् नेहा धुपिया चक्क एक महिन्याच्या बाळाला विसरुन पतीसोबत गेली फिरायला

नेहा धुपियाने एका घटनेबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ती देखील तिच्या ४० दिवसांच्या मुलीला सोडून ड्राईव्हवर गेली होती.

lifestyle
नेहा धुपिया तिच्या ४० दिवसांच्या मुलीला सोडून ड्राईव्हवर गेली होती.(Neha Dhupia/ Instagram)

अभिनेत्री नेहा धूपिया ही तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. आजकाल ती तिच्या कामात आणि तिच्या मुलीची काळजी घेण्यात खूप व्यस्त आहे. त्याच दरम्यान त्यांच्या एका ताज्या मुलाखतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री नेहा धुपिया ही पती अंगद बेदीसोबत ड्राईव्हला जाताना आपल्या एक महिन्याच्या मुलीला घेऊन जायला कसे विसरले हे सांगितले. ताहिरा कश्यपसोबत झालेल्या संवादादरम्यान तिने हा किस्सा सांगितला आहे.

ताहिरानेही खुलासा केला

ताहिरा कश्यपने नुकतेच तिचे ‘7 सिन्स ऑफ बिइंग अ मॉम’ हे पुस्तक लाँच केले आहे. या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ताहिराने नेहा धुपियाशी इंस्टाग्राम लाइव्हवर एका चॅप्टर बद्दल बोलली आहे. यादरम्यान ताहिराने सांगितले की, ती एकदा तिच्या मुलाला रेस्टॉरंटमध्ये विसरली होती. यावर नेहा धुपियाने एका घटनेबद्दल खुलासा केला आणि सांगितले की ती देखील तिच्या ४० दिवसांच्या मुलीला सोडून ड्राईव्हवर गेली होती.

नर्सचे बोलणे ऐकून नेहाला धक्काच बसला

यावेळी अभिनेत्री नेहा धुपिया ही तिच्या एक महिन्याच्या मुलीला कशी विसरून बाहेर फिरला याबद्दल सांगितले. यावेळी नेहा म्हणाली की, ‘मेहेरबाबतही त्यांच्यासोबत एक घटना घडली होती. त्यात लोकं म्हणतात तुम्ही ४० दिवस घरी बसा, म्हणून आम्ही तेच करत होतो. ४० व्या रात्री आम्ही सकाळची वाट पाहत होतो आणि आम्ही दोघेही खूप उत्साही होतो. दरम्यान यावेळी ४० दिवसांनंतर घराबाहेर पडण्याच्या आनंदात त्यांनी बाहेर लॉन्ग ड्राइवला फिरायला जाण्याचा विचार केला आणि दोघेही फिरायला गेले. यावेळी नेहा धुपिया म्हणाली की, आम्ही दोघांनीही सी लिंक पर्यंत जाण्याचे ठरवले होते कारण आमच्याकडे २ तास होते. त्यानंतर काही वेळांनी आम्हाला नर्सचा फोन आला तेव्हा आम्हाला बाहेर जाऊन ४५ मिनिटे झाली होती. तेव्हा नर्सने सांगितले की, बाळ रडत आहे… मी म्हणाली तुला कसं माहीत बाळ आमच्याकडे आहे आणि मग आम्ही मागच्या सीटवर पाहिलं आणि मग आम्हाला कळलं की आम्ही मुलीला आमच्या सोबत आणायला विसरलो. त्यामुळे घरी बाळ रडत होते आणि आम्ही तिला चुकून सोडले.

असा सविस्तर वृतांत यावेळी नेहाने सांगितला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neha dhupia reveals she forgot mehr when she was a month old went for a drive with angad bedi scsm

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या