मागील काही दिवसांपासून पाळीव श्वानांंनी लोकांवर हल्ला केल्याच्या घटनांचे अनेक व्हिडीओ आणि बातम्या समोर आल्या आहेत. यात अलीकडेच नोएडा आणि दिल्लीसारख्या शहरात श्वानाने लहान मुले आणि मोठ्या माणसांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. यातच आता हैदराबादमधून अशीच एक घटना समोर आली आहे, जी पाहिल्यानंतर तुम्हालाही धडकी भरेल. या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तरुणांचा एक जमाव एका व्यक्तीला आणि त्याच्या कुत्र्याला लाथा-काठ्यांनी जबर मारहाण करत आहेत. या जीवघेण्या हल्ल्यात ती व्यक्ती आणि कुत्रा गंभीररित्या जखमी झाले, मात्र तरीही आरोपी दोघांना मारहाण करणे थांबवत नाहीत. ही संपूर्ण घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

या घटनेच्या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुण आपल्या कुत्र्याला घेऊन रस्त्याने चालत असतो. यावेळी काही तरुणांचा जमाव त्याच्या दिशेने येतो आणि त्या कुत्र्यासह त्यालाही लाथा-काठ्यांनी मारहाण करू लागतो. या मारहाणीत तरुण जमिनीवर कोसळतो, पण तरीही तरुणांचा जमाव त्याला अतिशय निर्दयीपणे काठ्यांनी मारहाण करत राहतात. यावेळी त्याच्या कुत्र्यालाही जबर मारहाण करतात. या दरम्यान काही महिला मध्यस्ती करण्यासाठी पुढे येतात, परंतु हे आरोपी त्यांना ढकलून देतात. यावेळी बचाव करण्यासाठी तरुणाची पत्नी पुढे येते, मात्र तिलाही हे मारहाण करतात.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल
couple caught kissing and indulging in obscene act in crowded crut bus in odisha video goes viral
निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल
when Tanvi Azmi married Baba Azmi
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
delhi female animal feeder left bleeding criying pain after man attack her stray dogs with stick in raghubir nagar delhi shocking video viral
काका ‘तिची’ चूक काय? कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या तरुणीवर व्यक्तीचा जीवघेणा हल्ला; रक्तबंबाळ अवस्थेतील VIDEO केला शेअर
uber driver masturbated
“ड्रायव्हरने पँट काढली अन्…”; महिलेने सांगितला उबर टॅक्सीतला धक्कादायक अनुभव

यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हस्तक्षेप करत हे प्रकरण शांत केले, यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेले. स्थानिकांनी कुत्र्यासह त्याच्या मालकाला आणि पत्नीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हायरल व्हिडीओतील घटना ८ मे २०२४ रोजी घडली आहे. मधुरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहमत नगरमध्ये ही घटना घडली. येथे श्रीनाथ नावाच्या एका तरुणाने हस्की जातीचा कुत्रा पाळला आहे, पण या कुत्र्याने एक दिवस शेजारी राहणाऱ्या धनंजय यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला. यावरून श्रीनाथ आणि धनंजय यांच्यात भांडण झाले.

यानंतर संतापलेल्या धनंजयने बदला घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने जेव्हा श्रीनाथ कुत्र्याला घेऊन बाहेर निघाले, तेव्हा धनंजयने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला. श्रीनाथ यांच्यावर आरोपी धनंजय यांनी चार साथीदारांसह अमानुष हल्ला केला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी श्रीनाथ यांना बेदम मारहाण केली. यावेळी मध्यस्थीसाठी आलेल्या श्रीनाथ यांची आई आणि पत्नीलाही मारहाण करण्यात आली, ज्यात त्याही गंभीर जखमी झाल्यात. यात कुत्राही जखमी झाला.

निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल

मधुरानगर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत दोन्ही पक्षांच्या तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात आयपीसी कलम १४७, १४८, ३०७, कलम ३४ आयपीसीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, यासह आरोपींविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.