scorecardresearch

‘सोन्याचे कासव’ पाहून नेटकरी झाले आश्चर्यचकित; Viral Video पाहल्यावर तुमचाही डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

एका व्यक्तीच्या तळहातावर तीन कासवासारखे कीटक बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे कीटक पूर्णपणे ‘सोन्याचे’ बनलेले भासतात.

व्हिडीओमध्ये तुम्हाला 'गोल्डन टर्टल्स' उडताना दिसतील. (Photo : Twitter/@AmazingNature00)

निसर्ग आपल्याला दररोज हैराण करत असतो. निसर्गात अनेक गोष्टी आहेत ज्या अद्भुत आहेत आणि त्या पाहून आपण नक्कीच आश्चर्यचकित होतो. निसर्गाने सर्व प्रकारचे प्राणी निर्माण केले आहेत. त्यापैकी काही इतके अनोखे आहेत की त्यांच्याबद्दल पहिल्यांदाच जाणून घेतल्यावर आपल्याला विश्वास बसणार नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओमध्ये तुम्हाला ‘गोल्डन टर्टल्स’ उडताना दिसतील.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. एका व्यक्तीच्या तळहातावर तीन कासवासारखे कीटक बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे कीटक पूर्णपणे ‘सोन्याचे’ बनलेले भासतात. असे कासव तुम्ही क्वचितच पाहिले असेल, जे सोन्याचे वाटतात. तथापि, हे कासव नाहीत, तर ते प्रत्यक्षात कीटक आहेत.

Viral Video : मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओकडून आणखी एक गाणे रिलीज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

राजस्थानच्या रणरणत्या उन्हात सायकलवरून पोहोचवायचा डिलिव्हरी; नेटकऱ्यांनी मिळून केली अशी मदत

व्हिडीओमध्ये दिसणार्‍या या ‘सोनेरी कीटकांचे’ नाव आहे चेरिडोटेला सेक्सपंक्टटा. तो पाने आणि गवत खातो. हा किडा पूर्णपणे शाकाहारी आहे. या विचित्र कीटकांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर कोणीही त्यांना ‘सोनेरी कासव’ समजेल. @AmazingNature00 नावाच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका सुंदर आहे की त्याला आतापर्यंत १.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका माणसाच्या तळहातावर हे तीन अनोखे कीटक फिरत आहेत. पहिल्या पाहिल्यावर असे वाटते की हे लहान कासव आहेत, जे सोन्याचे बनलेले आहेत. मात्र, नंतर हे कीटक फिरताना आणि उडताना दिसतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netizen was surprised to see golden turtle you cant believe your eyes after watching this viral video pvp