netizens unhappy on neha kakkar remake of falguni pathak song maine payal he | Loksatta

Viral : फाल्गुनी यांच्या ‘या’ गाण्याच्या रिमेकवर नेटकरी जाम संतापले, नेहाला म्हणाले गाणे बिघडवण्यासाठी तुला..

सध्या रिमेकचा जमाना असल्याने अनेक जुनी गाणी नव्या स्वरुपात प्रेक्षकांपुढे मांडली जात आहेत. फाल्गुनी यांच्याही एका लोकप्रिय गाण्याचा रिमेक तयार करण्यात आला आहे. मात्र या रिमेकवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Viral : फाल्गुनी यांच्या ‘या’ गाण्याच्या रिमेकवर नेटकरी जाम संतापले, नेहाला म्हणाले गाणे बिघडवण्यासाठी तुला..
फाल्गुनी पाठक

फाल्गुनी पाठक यांच्या मधूर गाण्यांनी सर्वांच्या मनात घर केले आहे. ‘इंधना विनवा’, ‘सावन मे मोरणी बनके’ आणि ‘चुंडी जो खनके हाथो मे’, ही गाणे तर चांगलीच गाजली होती. आजही या गाण्यांवर तरुणाई थिरकते. दरम्यान सध्या रिमेकचा जमाना असल्याने अनेक जुनी गाणी नव्या स्वरुपात प्रेक्षकांपुढे मांडली जात आहेत. फाल्गुनी यांच्याही एका लोकप्रिय गाण्याचा रिमेक तयार करण्यात आला आहे. मात्र, या रिमेकवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

फाल्गुनी यांचे गाणे ‘मैने पायल है छनकाई अब तो आजा तू हरजाई’ या गाण्याचे रिमेक बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे गाणे रिमेकसाठी चर्चेत असलेली गायिका नेहा कक्कड हिने गायले आहे. ‘ओ साजना’ असे या गाण्याचे नाव असून ते नव्या स्वरुपात मांडण्यात आले आहे. मात्र, फाल्गुनी पाठक यांच्या चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

(इर्टिगाचे नवे अवतार आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच, ‘या’ कॅमेऱ्याची जोरदार चर्चा, कारच्या सुरक्षेसाठी दिले हे फिचर)

‘कुछ कर तू मेरे लिये, मैने तो अब तेरे लिये, अब तक शादी न करवायी, मैने पायल है छनकायी..’ असे हे गाणे नव्या स्वरुपात मांडण्यात आले आहे. यात नेहा नृत्य देखील करताना दिसत आहे. मात्र, सदाबाहार असलेल्या फाल्गुणी यांच्या गाण्याचा रिमेक नेटिझन्सला पसंत आल्याचे दिसत नाही. नेटकऱ्यांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रतिक्रियांमधून त्यांना हे गाणे पचणी पडल्याचेच वाटत आहे.

नेहाला तर अवार्ड मिळायला हवा..

नेटकरी रिमेकपासून नाखूष दिसत आहेत. एकाने तर गाणे बिघडवण्यासाठी नेहाला पुरस्कार दिला पाहिजे असे म्हटले, तर दुसऱ्या एका ट्विटर युजरने मैने पायल है छनकाई या गाण्याला सोड अशी विनंती केली आहे. तर काहींनी फार मजेदार व्हिडिओ शेअर केले आहेत. दरम्यान ओ सजना हे गाणे १९ सप्टेंबरला रिलिज झाले आहे. आता या गाण्यावरील ट्विटर युजर्सच्या प्रतिक्रियांवर नेहा काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-09-2022 at 18:24 IST
Next Story
हायवेवर सायकल चालवत होता अन् अचनाक बिबट्याने हल्ला केला, पुढे काय झालं, पाहा VIRAL VIDEO