रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीने केलं असं काही की, CCTV फुटेज पाहून नेटीझन्स झाले थक्क

या तरुणीचा रिकाम्या ऑफिसमधला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी का व्हिडीओ रीपोस्टही केला आहे तर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Girl in Office Alone Video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @lov4itzy / Twitter )

अनेक वेळा आपण घरात एकटे असताना नाचणे, गाणे, मोठ्याने ओरडणे अशा अनेक गोष्टी करत असतो. पण तुम्ही ऑफिसमध्ये एकटे असतानाही असचं करता का? असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी ऑफिसमध्ये एकटीने काही विचित्र कृत्य करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुलगी अचानक नाचू लागते

सीसीटीव्ही (CCTV) फुटेज @lov4itzy नावाच्या अकाऊंटने ट्विटरवर शेअर केले होते. जिथून या मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही रिकामे ऑफिस पाहू शकता. ती मुलगी आधी साफसफाई करत होती. मग साफसफाई करताना अचानक ती नाचू लागली.

( हे ही वाचा: दात असलेला चीजबर्गर? बर्गर सारखा दिसणारा माशाचा फोटो व्हायरल! )

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑफिसच्या वेगवेगळ्या भागात साफसफाई करताना मुलगी डान्स करत आहे. कधी ती सोफा झाडताना कंबर मटक्वते असते तर कधी फरशी पुसताना ती ठुमके लागावते. व्हिडीओमध्ये इतर कोणीही दिसत नाही. संपूर्ण ऑफिसमध्ये मुलगी फक्त एकटीच दिसते.

( हे ही वाचा: बकरी फाइल घेऊन पळाली आणि ऑफिसमधले कर्मचारी बसले उन शेकत; व्हिडीओ व्हायरल )

एक माणूस नाचताना पाहतो

मात्र, व्हिडीओच्या शेवटी ऑफिसमधला एक माणूस तिला डान्स करताना बघतो. व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये @ITZYofficial टॅग केले आहे. वास्तविक @ITZYofficial हा दक्षिण कोरिया संगीत उद्योगातील एक प्रतिष्ठित गट आहे. या ग्रुपमध्ये चार मुली आहेत, ज्यांचे अल्बम संपूर्ण दक्षिण कोरियामध्ये खूप प्रसिद्ध आहेत.

( हे ही वाचा: अलिगडच्या कॉलेजमध्ये घुसला बिबट्या, विद्यार्थ्यांवर केला हल्ला; थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद )

मुलीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर, लोकांना तिच्या डान्स मूव्ह्सचा चांगलाच पसंती मिळत आहे. तुम्ही बघू शकता की मुलगी खूप छान नाचत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Netizens were shocked to see cctv footage of a young woman doing something in an empty office ttg

Next Story
Viral Video: ११ महिन्यांच्या बाळाचा चिकन विंग्सवर ताव; व्हिडिओ पाहून नेटीझन्सही आवाक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी