Premium

VIDEO : दहा मिनिटे घरी उशीरा जा पण असा प्रवास करू नका! धावत्या रेल्वेनी फरपटत नेले, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

भारतात सर्वाधिक लोकं दररोज रेल्वेने प्रवास करतात पण रेल्वेने प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे. दहा मिनिटे घरी उशीरा जा पण असा जीवघेणा प्रवास करू नका.

a man got train accident
दहा मिनिटे घरी उशीरा जा पण असा प्रवास करू नका! धावत्या रेल्वेनी फरपटत नेले, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Photo : YouTube)

Viral Video : सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावरील अनेक अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. दररोजच्या धावपळीच्या जगात अनेक जण चालल्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चालत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा तोल जातो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येऊ शकतो.
भारतात सर्वाधिक लोकं दररोज रेल्वेने प्रवास करतात पण रेल्वेने प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे. दहा मिनिटे घरी उशीरा जा पण असा जीवघेणा प्रवास करू नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन व्यक्ती धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यापैकी एक सुरक्षित रेल्वेत चढतो पण दुसऱ्या व्यक्तीचा तोल जातो. हा व्यक्ती रेल्वेच्या दरवाज्याला लटकून फरपटत जाताना व्हिडीओत दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईन.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! आता… महिलेच्या छातीवर दिला ऑटोग्राफ, VIDEO व्हायरल होताच फुटलं वादाला तोंड

railway_gyan.comm या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “मरता मरता वाचला हा व्यक्ती, कृपया तुम्हीही अशी चूक करू नका”
या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लोकं गंभीरपणे वागत नाही… आणि मग अपघात झाला की रेल्वेला दोष देतात” तर एका युजरने लिहिलेय, “काका.. एवढी घाई कशाला.. कुठे जायचं.. उगाच मरणाला आमंत्रण देत आहात.”
एका युजरनी व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीवर टिका करत लिहिलेय, “व्हिडीओ काढण्याऐवजी त्या व्यक्तीला मदत करायला पाहिजे होती..”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Never do dangerous travelling by train a man got running train accident video goes viral ndj

First published on: 22-09-2023 at 17:48 IST
Next Story
काकूने घेतला भन्नाट उखाणा; म्हणाल्या, “इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर…” व्हिडीओ एकदा पाहाच