scorecardresearch

Premium

लहान मुलांना चुकूनही फ्रीज उघडायला देऊ नका! ४ वर्षाच्या चिमुकलीचा Video पाहून अंगावर येईल काटा

Video: या बातमीचा हेतू सुद्धा तुम्हाला घाबरवण्याचा नसून तुम्ही जेव्हा तुमच्या चिमुकल्यांसह अशा ठिकाणी जाता तेव्हा योग्य ती काळजी घ्यावी याची आठवण करून देणे हा आहे.

Never Let Your Kid Play With Fridge At Home Or Super Market These Four year Old Girl Died Due to Current Stuck in Refrigerator
फ्रीजमुळे ४ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Viral Video: मॉलमध्ये किंवा सुपरमार्केटमध्ये गेल्यावर आईस्क्रीमचे मोठे डबे ठेवलेल्या फ्रीजकडे चिमुकल्यांना धाव घेण्याची सवय असते. एवढंच नाही तर घरातही सतत फ्रीजच्या दाराला लटकून खेळण्याची लहान मुलांना सवय असते. पण पालकांनो, तुम्ही काही सेकंद दुर्लक्ष केल्यास आयुष्यभराचा पश्चाताप वाट्याला येऊ शकतो हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. निझामाबाद येथील नंदीपेठ भागात एका चार वर्षीय चिमुकलीचा फ्रीज उघडताना विजेचा धक्का दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, नवीपेठ येथील एका सुपरमार्केटमध्ये राजशेखर हे त्यांची मुलगी रुशिता (४ वर्षे) हिला घेऊन किराणा सामान घेण्यासाठी गेले होते. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजमध्ये आपण पाहू शकता की, ही चार वर्षांची चिमुकली, फ्रीज उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तेवढ्यात तिला विजेचा करंट लागतो.

Drink One Glass Jeera Water In A Day To Save Thousands of Rupees On Beauty Treatments Doctor 10 Amazing Benefits Read
Daily Routine: दिवसभरात एकदा ‘जिऱ्याचे पाणी’ पिण्याचे १० फायदे वाचून व्हाल खुश! वाचवा तुमचे पैसे
Gauri Kulkarni
“हो मी एन्गेज आहे…”, ‘आई कुठे काय करते’मधील गौरीने साखरपुड्याच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली “कोणामध्ये तरी गुंतलेली…”
Jaipur couple caught kissing on moving motorcycle, video goes viral
VIDEO: चालत्या बाईकवर जोडप्याचा ‘रोमान्स’ व्हायरल, एकमेकांना KISS करत…बेभान जोडप्याने ओलांडल्या सर्व मर्यादा
woman sit on bike and wearing wrong helmet video viral
Funny Video : हेल्मेट घालण्याची नवीन पद्धत पाहिलीय का? तरुणीच्या डोक्यावरचं हेल्मेट पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

सुरुवातीला राजशेखर यांच्याही काही लक्षात येत नाही. ते फ्रीजमधून काहीतरी काढतात आणि मग त्यांचं लक्ष लेकीकडे जातं, मात्र विजेचा करंट इतका जास्त असतो की त्यांची लेक फ्रीजमध्येच अडकते आणि तिथेच तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. सुपरमार्केटच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली क्लिप सोमवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: फ्रीजमुळे ४ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

हे ही वाचा<<तरुणींच्या गाडीचा बाईकवरून पाठलाग करत विकृत करत होता हस्तमैथुन! Video मध्ये कैद झाला गलिच्छ प्रकार

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली आहे. या बातमीचा हेतू सुद्धा तुम्हाला घाबरवण्याचा नसून तुम्ही जेव्हा तुमच्या चिमुकल्यांसह अशा ठिकाणी जाता तेव्हा योग्य ती काळजी घ्यावी याची आठवण करून देणे हा आहे. शक्यतो घरी सुद्धा दर तीन महिन्यांनी विद्युत उपकरणांचे वायरिंग आणि अर्थिंग तपासून घ्यावे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Never let your kid play with fridge at home or super market these four year old girl died due to current stuck in refrigerator svs

First published on: 03-10-2023 at 12:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×