Viral Video : लग्न हा अत्यंत पवित्र सोहळा असतो. प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. दोन व्यक्ती नव्या आयुष्याची सुरुवात करतात. लग्नानंतर पती पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास, आपुलकी, काळजी आणि जिव्हाळा यावर टिकून राहते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या मांडवात गुरुजी नवरदेवाला असे काही सांगतात की ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्हाला प्रश्न पडला असेल गुरूजीने नवरदेवाला असे काय सांगितले? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. व्हिडीओमध्ये हवन सुरू आहे. हवनसमोर नवरदेव आणि नवरी बसलेले दिसत आहे. त्यांच्या शेजारी गुरूजी आणि नातेवाईक बसलेले आहेत आणि आजुबाजूला अवतीभोवती नातेवाईक बसलेले दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये गुरूजी पाचवे वचन नवरदेवाला समजून सांगताना म्हणतात, “कधीही पत्नीला असे बोलू नका की तुझ्या आई वडिलांनी काय दिले? ज्यांनी आपली मुलगी दिली, त्यांनी सर्वकाही दिले. हे तेव्हा माहिती होते जेव्हा आपली मुलगी द्यावी लागते. त्यामुळे ही गोष्ट कधीही बोलू नका. हे खूप पवित्र बंधन आहे. हे पाचवे वचन आहे, यामध्ये पत्नी मान सन्मान मागते. माझ्या कुटुंबातील लोकांचा आदर करावा. मी तुमच्या कुटुंबातील लोकांचा आदर करणार तर तुम्हीही आदर करावा. त्यामुळे कधीही रागात सुद्धा हे बोलू नका की काही दिले नाही.”
गुरुजींचा हा सुंदर संदेश ऐकून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “जिएंगे साथ, मरेंगे भी साथ” भर रस्त्यावर जोडप्यानी केली दुचाकीवर जीवघेणी स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : शाळेचा पहिला दिवस; आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी, ‘या’ चिमुकल्यांचा VIDEO पाहून तुम्हालाही आठवतील शाळेचे दिवस

wedding____vibes80 या इन्स्टाग्राम अकाउंटरवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाचवे वचन” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “गुरुजींना मनापासून मोठा सलाम” तर एका युजरने लिहिलेय, “खरं बोललात. हे तेव्हा माहिती पडते जेव्हा आपली मुलगी द्यावी लागते” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक वडील सर्वकाही देतो पण तरीही मुलीला म्हणतात तुझ्या वडिलांनी काय दिले?” या व्हिडीओवर अनेक युजरनसी संताप व्यक्त करत हुंडाबळीविरोधात आवाज उठवलाय.