Hyundai Venue 2025 Launch: भारतातील ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पुन्हा एकदा खळबळ. एका लोकप्रिय SUV ने आज नव्या अवतारात भव्य पुनरागमन केलं आहे. ही कार केवळ डिझाईननेच नाही तर टेक्नॉलॉजी, परफॉर्मन्स आणि सेफ्टी फीचर्सच्या बाबतीतही आपल्या सेगमेंटमध्ये नवा बेंचमार्क ठरू शकते. होय! आपण बोलतोय Hyundai Venue आणि तिच्या स्पोर्टी व्हर्जन Venue N Line विषयी. ह्युंदाईने आज अधिकृतरीत्या या दोन्ही SUV चे नवे अवतार भारतात सादर केले आहेत. पहिल्या जनरेशन Venue च्या प्रचंड यशानंतर कंपनीने या सेकंड-जनरेशन मॉडेलला अगदी शार्प आणि प्रीमियम बनवले आहे.

डिझाईनमध्ये आली प्रीमियम झळाळी

नव्या Venue आणि Venue N Line चा लूक आधीपेक्षा अधिक दमदार आणि मॉडर्न आहे. समोर मोठा रेक्टॅंग्युलर ग्रिल, डार्क क्रोम फिनिश, क्वाड-बीम LED हेडलॅम्प्स आणि वरती असलेले C-शेप DRLs हे सर्व मिळून या SUV ला आलिशान ओळख देतात. साइड प्रोफाइलमध्ये नवीन १६-इंच अलॉय व्हील्स आणि सिल्व्हर इंसर्ट्स Venue च्या स्टाईलला आणखी धार देतात. पाठीमागे ‘3D Venue’ लोगो आणि कनेक्टेड टेललॅम्प्ससह दिलेला मस्क्युलर बंपर या कारला स्पोर्टी फिनिश देतो.

टेक्नॉलॉजी, लक्झरी परफेक्ट कॉम्बो

Hyundai ने केबिनमध्ये पूर्ण बदल केले आहेत. नवीन ड्युअल-टोन डार्क नेव्ही आणि डव व्हाईट इंटीरियर थीम, ट्विन १२.३-इंच कर्व्ड डिस्प्ले आणि टेराझो टेक्स्चर असलेला डॅशबोर्ड हे सर्व मिळून केबिनला अगदी प्रीमियम लूक देतात. पाठीमागील सीट्स आता अधिक आरामदायी झाल्या असून २०mm जास्त व्हीलबेस, रिअर AC वेंट्स, सनशेड्स आणि रीक्लाइनिंग सीट्समुळे लांबच्या प्रवासातही कम्फर्ट कायम राहतो.

ADAS आणि सेफ्टी फीचर्सचा जबरदस्त पॅक

या नव्या SUV मध्ये लेव्हल-२ ADAS टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, जी ड्रायव्हिंगला अधिक सेफ बनवते.
तसेच ६ एअरबॅग्स, ESC, ३६०-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसारख्या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा दिल्या आहेत. वायरलेस Android Auto / Apple CarPlay, वॉइस असिस्टेड सनरूफ, वेंटिलेटेड सीट्स आणि एम्बियंट लाईटिंग हे फीचर्सही आकर्षणाचे ठरतात.

इंजिन आणि परफॉर्मन्स

ह्युंदाईने Venue ला तीन पॉवरफुल इंजिन ऑप्शन्ससह सादर केलं आहे.
१.२L पेट्रोल इंजिन,
१.०L टर्बो पेट्रोल आणि
१.५L डिझेल.

विशेष म्हणजे, आता डिझेल व्हर्जनमध्येही ६-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. Venue N Line मात्र फक्त १.०L टर्बो पेट्रोल इंजिनसह मिळते, ज्यात ६-स्पीड मॅन्युअल आणि ७-स्पीड DCT ट्रान्समिशनचे पर्याय आहेत.

आता सर्वात मोठा प्रश्न किंमत किती?

ह्युंदाईने या नव्या SUV ची किंमत ठेवली आहे फक्त ७,८९,००० रुपये (एक्स-शोरूम) पासून. या किमतीत तुम्हाला मिळते जबरदस्त डिझाईन, प्रीमियम फीचर्स आणि हाय-टेक परफॉर्मन्सचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन.

थोडक्यात, नव्या अवतारात आलेली Hyundai Venue आणि Venue N Line SUV आता अधिक बोल्ड, स्मार्ट आणि लक्झरीयस बनली आहे. कंपनीचा दावा आहे ही Venue SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा गेमचेंजर ठरणार आहे.