आता जेव्हा साथीचा रोग करोना बऱ्यापैकी कमी झाला आहे तेव्हापासून ऑफिस पुन्हा सुरू झाले आहेत. आता हळू हळू वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करणे आता बंद होत आहेत. घरून काम करणे कितीही छान वाटत असले तरी यामुळे आपण मर्यादित सुट्ट्याचं घेऊ शकतो. अॅक्शनस्टेप नावाच्या न्यूझीलंडस्थित सॉफ्टवेअर कंपनीने त्यावर उपाय शोधला. कंपनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना अमर्यादित वार्षिक रजा देत आहे. कंपनीने सुट्ट्यांवरील कॅप काढून टाकली आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना पाहिजे तितक्या सुट्टीवर जाण्याची परवानगी दिली आहे.
कंपनीचे उपाध्यक्ष स्टीव्ही मेह्यू यांनी याला “हाय-ट्रस्ट मॉडेल” म्हटले आहे. ते म्हणाले, “यामुळे लोकांना आवश्यक असलेली रजा घेऊ शकतील आणि नंतर सुट्टीवरून येऊन आमच्यासाठी ते सर्वोत्तम काम करु शकतात.” पुढे ते म्हणाले की, “सुरुवातीला थोडासा संशय होता आणि ‘मी फक्त तीन महिने सुट्टी घेऊन जाऊ शकतो का?’ असे काही प्रश्न विचारले गेले, परंतु आम्ही आमच्या कर्मचार्यांसह सर्व प्रश्नांवर काम करू शकलो आणि त्यांना या संधीसाठी प्रोत्साहित केले. आमचा आमच्या कर्मचार्यांवर विश्वास आहे आणि आशा आहे की त्यांचाही आमच्यावर विश्वास आहे.”
(हे ही वाचा: मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आईकडून पोलिसांनी करून घेतली मालिश, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)
(हे ही वाचा: नवरीने वरमाळा घालताना केली चूक, वराला आला राग आणि मग…; video viral)
कंपनी अमर्यादित रजा देत असली तरी, ती आपल्या कर्मचार्यांना किमान चार आठवड्यांची सुट्टी घेण्यास प्रोत्साहित करते. कंपनीने जगभरातील त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये ही किमान आवश्यकता लागू केली आहे. बर्याच कंपन्यांनी चार दिवसांच्या कामकाजाचा आठवडा देखील वापरून पाहिला, परंतु मेह्यूच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण त्यांना आवश्यक असलेला वेळ देऊ शकेल याची खात्री करण्यासाठी अमर्यादित वार्षिक रजा सुरू करण्याचा बोर्डाचा निर्णय हा सर्वोत्तम मार्ग होता. त्यांनी इतर कंपन्यांनाही हा प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले.