आजकाल कोणताही बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला त्याचं योग्यप्रकारे मार्केटिंग करता यायाला पाहिजे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कित्येक जण एकापेक्षा एक चांगल्या ऑफर घेऊ येत असतात आतापर्यंत तुम्ही आता खरेदी करा नंतर पैसे भरा अशा प्रकराच्या ऑफर पाहिल्या असतील. ग्राहकांना इंस्टॉलमेंट पेमेंटचा ऑफर दिल्या जातात. पण आता एका रेस्टॉरंटने ग्राहकांसाठी विचित्र ऑफर दिली आहे जी ऐकून तुम्ही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृत्यूनंतर पिझ्झाचे बिल भरण्याची दिली ऑफर


खरंतर न्युझीलंडने एक पिझ्झा चेन रेस्टॉरंटने बिल भरण्यासाठी आगळी वेगळी ऑफर दिली आहे. यांनी Afterlife Pay म्हणजेच मृत्यूनंतर बिलाचे पैसे देण्याची ऑफर सुरू केली आहे. ब्रँडच्या वेबसाइटनुसार, ही ऑफर केवळ ६६६ ग्राहकांसाठी दिली जाईल. यामध्ये ग्राहकांना एक करार करावा लागेल ज्यामध्ये मृत्यूनंतर पिझ्झाचे बिल भरतील असे मान्य करतील.

हेही वाचा – Breast Milk Coffee: ब्रेस्ट मिल्कपासून तयार केलेली कॉफी सर्व्ह करणार हा कॅफे? किंमत देखील ठरली, जाहिरात पाहून भडकले लोक

कोणतेही छुपे शुल्क किंवा दंड नाही’

ग्राहकांना पहिल्यांदा ही ऑफर फार विचित्र वाटली पण पिझ्झा कंपनीने त्यांना आश्वस्त केले की यामध्ये कोणतेही छुपे शुल्क किंवा दंडू लागू होणार नाही. खरंतर सीईओ बेन कमिंग यांचा दावा आहे की ही व्यवस्था न्युझीलंडच्या नागरिकांना आता खरेदी करा आणि नंतर पैसे भराण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणूकीची भिती कम करते.

मृत्यूनंतर कसे भरणार बिल?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ऑफर घेणाऱ्या व्यक्तींसह करार केला जाईल ज्यामध्ये त्यांच्या मालमत्तेमध्ये बदल करून त्यामध्ये न भरलेल्य पिझ्झाचे शुल्क जोडले जाईल. विशेष म्हणजे या शुल्कावर कोणतेही व्याज आकाराला जाणार नाह

दुसरीकडे न्युझीलंडमध्ये ग्राहक सुरुक्षा अधिनियमानुसारया योजनचा संपूर्ण अभ्यास केला आणि चेतावनी दिली की या ऑफरमध्ये तुम्हाला व्यसन लागू शकते आणि कोणतीही व्यक्ती कर्जामध्ये अडकू शकते. अधिकाऱ्यांनी ग्राहकांना इशारा दिला की ते फक्त फुकट पिझ्झा मिळविण्यासाठी या ऑफरचा वापर करू शकत नाही
हेही वाचा – तासनतास सोशल मीडिया वापरता? आता पैसेही कमवा! व्हिडिओ पाहण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय ८ हजार रुपये

ऑप्टरलाईफ पे ऑफरसाठी करू शकता नोंदणी

ही योजना मुळ स्वरुपामध्ये न्युझीलंडमध्ये लोकांना राहणीमानातील जास्त खर्च हातळण्यासाठी मदत करतो. ऑफर घेणारे ग्राहक पिझ्झा चेनच्या अधिकृत वेबसाईटवर ऑफ्टरलाईफ पे वर नोंदणी करू शकतात. निवडलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेमध्ये स्वच्छेने स्वाक्षरी घेतली जाईल. पिझ्झा की किंमतीवर मृत्यूनंतर कोणतेही व्याज लावले जाणार नाही आणि हा सौदा कायद्यानुसार लागू करणे योग्य आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand pizza chain offers unique buy now pay in the afterlife option for customers snk
First published on: 29-05-2023 at 16:50 IST