बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, "लग्नात अशीच नवरी…" | Loksatta

बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”

डीजे वाजताच भर लग्नसोहळ्यात नवरीसोबतच इतर महिलाही थिरकल्या.

बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”
नवरीने नवऱ्यासमोरच केला भन्नाट डान्स (image credit – social media)

डीजेच्या तालावर ठुमके मारायला सर्वांना आवडत असेल, पण भन्नाट डान्स करायला जिगर लागतो. सोशल मीडियावर अनेकांनी डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर केल्याचं आपण पाहिलं असेल. पण एका लग्नमंडपात नवरीने तिच्या मैत्रिणींसोबत केलेला भन्नाट डान्सचा असा व्हिडीओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल. नवरा-नवरी स्टेजवर असताना डीजेच्या तालावर नवरीने जबरदस्त ठुमके लगावले. एव्हढच नाही तर तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनाही भन्नाट डान्स करण्याचा मोह आवरला नाही. डीजे वाजताच भर लग्नसोहळ्यात नवरीसोबतच इतर महिलाही थिरकल्या. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकरीही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

एका नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नवरी तिच्या मैत्रिणींसोबत डीजेच्या तालावर भन्नाट डान्स करते. हे सर्व पाहिल्यानंतर नवऱ्याचे हावभावही बघण्यासारखे असतात. कारण नवरी स्टेजवर अशाप्रकारे ठुमके लगावेल याची त्याला कल्पनाच नसावी. सोशल मीडियावर या व्हिडीओला अनेक लाईक्स मिळत असून व्हिडीओच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन होत आहे. लग्नमंडपात नवरा-नवरी स्टेजवर बसलेले असतात. त्यावेळी नवरीच्या मैत्रिणी अचानक स्टेजवर येतात. त्यानंतर नवरी जो काही भन्नाट डान्सचा नजारा दाखवते, ते पाहून नवऱ्यालाही धक्काच बसतो. गाण्याचे बोल ऐकताच नवरीसह तिच्या मैत्रिणी जबरदस्त ठुमके लगावत लोकांचं मनोरंजन करतात.

इथे पाहा व्हिडीओ

नक्की वाचा – दुबईत काम करणारा भारतीय रातोरात कोट्यधीश झाला, असे जिंकले ५५ कोटी रुपये, पत्नीला फोन केला अन्…

नवरीच्या डान्सचा व्हिडीओ @Gulzar-Saheb नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं, माझं लग्न असं डान्स करणाऱ्या नवरीसोबत झालं पाहिजे. नाहीतर मी मंडपातून उठून पळून जाईल. या व्हिडीओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून आतापर्यंत जवळपास तीन लाख व्यूज मिळाले आहेत. तर १२ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. काही युजर्सने प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं, भाई (नवरा) ही विचार करत असेल, आता करायचं तरी काय? मोठ्या कठीण परिस्थितीत मिळाली तर मिळाली ही नवरी. तर दुसऱ्या एकाने म्हटलं, नवऱ्याची तर आता वाटच लागली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 13:23 IST
Next Story
Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…