लग्नाच्या दिवशी नायजेरियन महिला नटली भारतीय वधूच्या वेशात; Viral Video ने जिंकले लाखो नेटकऱ्यांचे मन

सध्या नायजेरियन महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या मेकओव्हरने लोकांची मने जिंकली आहेत.

लग्नाच्या दिवशी नायजेरियन महिला नटली भारतीय वधूच्या वेशात; Viral Video ने जिंकले लाखो नेटकऱ्यांचे मन
भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये वधू-वर इतके नटतात की सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. (Instagram)

भारतीय लग्नसमारंभ म्हणजे एक उत्सवच असतो. लग्नानंतर वधू आणि वराचे आयुष्यच बदलून जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न ही एक महत्त्वाची घटना आहे. यानंतर या दोन्ही व्यक्ती एकमेकांसह एका अतूट बंधनात बांधल्या जातात. सोशल मीडियावरही लग्नाशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये लग्नातील डान्स, हळदी समारंभ, मेहंदी समारंभ, वेगवेगळे फोटोशूट, नवरीच्या मेकअपचे व्हिडीओ आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो.

भारतीय लग्नपद्धतीबद्दल संपूर्ण जगाला कुतूहल आहे. पाश्चिमात्य देशांना भारतातील विवाह पद्धतीचे विशेष आकर्षण आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. एका परदेशी लग्नात काही तरुण बॉलिवूडच्या गाण्यांवर मनसोक्त नाचताना दिसत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर परदेशात भारतीय लग्न समारंभांविषयी असलेली क्रेझ आपण पाहू शकतो. त्यांच्यासाठी हे खूप वेगळं आणि नवीन आहे. त्यांनी कधी पाहिलं नाही किंवा जगलेलं नाही, ते इथे करू शकतात.

क्षुल्लक कारणावरून ‘या’ महिलेने ९० सेकंदांत रिक्षाचालकाला मारल्या १७ थप्पड; Viral Video पाहून तुम्हालाही येईल राग

भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये वधू-वर इतके नटतात की सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात. यावेळी वधूच्या मेकअपची चर्चा होते आणि मग लोक मेकअप आर्टिस्टचेही कौतुक करतात. सध्या नायजेरियन महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिच्या मेकओव्हरने लोकांची मने जिंकली आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही नायजेरियन महिलेला भारतीय वधूच्या वेशभूषेत पाहू शकता. पंजाबची मेकअप आर्टिस्ट नेहा वरिच ग्रोवरने या महिलेच्या वेडिंग लुकचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओ शेअर करताना नेहाने लिहिले की, ‘आफ्रिकन मुलीला भारतीय वधू म्हणून सजवणे हे माझे स्वप्न होते. मी यासाठी आफ्रिकन मॉडेल शोधत होते, तेव्हा मला ही खरी वधू सापडली..यिप्पी! मी खूप भाग्यवान समजते. मला तिच्या लग्नाच्या दिवशी तिला एक गोंडस बाहुली बनवण्याची संधी मिळाली.’

दरम्यान, नेटकऱ्यांना ही नायजेरियन वधू खूप आवडली असून, तिच्या मेकओव्हरने सर्वांचीच मने जिंकली आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nigerian woman dressed as indian bride on her wedding day viral video won the hearts of millions of netizens pvp

Next Story
शेतीसाठी करता येणार मानवी लघवीचा वापर; संशोधकांनी सुरु केला अभ्यास
फोटो गॅलरी