Desi Girl Driving Luxury Car Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओत सामान्य लोक अशी काहीतरी असामान्य हटके, भन्नाट गोष्ट करतात आणि सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एक हटके व्हिडीओची जोरदार चर्चा सुरू आहे, कारण यात एक महिला आपल्या देसी अंदाजात साधीसुधी नाही तर लक्झरी कार चालवताना दिसत आहे. डोक्यावर पदर घेऊन कार चालवण्याचा तिचा तो आत्मविश्वास, स्वॅग, सहजता पाहून अनेकजण चकित झालेत.
महिला सहसा कार, स्कूटर, बाईक चालवताना दिसतात. पण ट्रॅक्टर, बस किंवा ट्रक अथवा स्पोर्ट्स कार चालवताना क्वचितच पाहायला मिळतं. पण, ही महिला त्या सगळ्या कल्पना मोडून काढताना दिसते, याचा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक महिला अगदी देसी अंदाजात लक्झरी कार चालवतेय. महिलेने डोक्यावर पदर घेतला असून ती अगदी पारंपरिक पोशाखात दिसत आहे. या देसी पेहरावात महिला स्पोर्ट्स कार चालवत असल्याने पाहणारा प्रत्येकजण भारावून जात आहे.
तिची ड्रायव्हिंग स्टाईल, वाहनावरचं नियंत्रण आणि पारंपरिक वेषातही सहजतेनं हाताळत असलेली स्पोर्ट्स कार; या सगळ्यामुळेच हा व्हिडीओ एवढा लोकप्रिय झाला आहे. पाहताना एक क्षण तरी असं वाटतं की ही महिला एखाद्या प्रोफेशनल ड्रायव्हरसारखीच वाहन चालवत आहे.
स्पोर्टस कार चालवणाऱ्या या महिलेचे नाव निक्की दहिया असे असून, ती दिल्लीतील कंटेंट क्रिएटर आहे, जी व्हिडीओत आत्मविश्वासाने लक्झरी कार चालवताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे निक्की दहिया इंटरनेटची नवीन ‘देशी क्वीन’ बनली आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
महिलेचा स्पोर्ट्स कार चालवतानाचा हा व्हिडीओ @ndahiya2026 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओने सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘हे खूपच अप्रतिम दिसत आहे.’ तर दुसऱ्या युजरने ‘baddie’ अशी कमेंट केली. तिसऱ्या युजरने लिहिले, ‘पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांची कामगिरी.’ तर आणखी एका युजरने कमेंट केली की, ‘आपल्या संस्कृतीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, एवढं असूनही डोक्यावरचा पदर तसाच आहे.’
