निता अंबानींच्या मोबाईलची किंमत ३** कोटी?

असं काय आहे या फोनमध्ये…

हा फोन पूर्णपणे २४ कॅरेट सोन्यापासून बनवला आहे. यावर प्लॅटिनमची कोटींग देखील त्यामुळे हा फोन पडला तरी तुटणार नाही.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या उद्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी निता अंबानींचं राहणीमान हे नेहमीच त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारं असंच आहे. त्यांचं राहणीमान, त्यांचे कपडे, आलिशान घड्याळं, ब्रँडेड सँडल, महागडे परफ्युम हे सगळंचं चर्चेचा विषय असतो. एका इंग्रजी साईटने दिलेल्या माहितीनुसार नीता अंबानी या जगातील सर्वात महागडा असा मोबाईल फोन वापरतात. या फोनची किंमत ऐकली तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना चक्कर येऊ शकेल. त्या जो फोन वापरतात त्याची किंमत ३११ कोटी असल्याची चर्चा आहे.

निता अंबानी या ‘फाल्कन सुपरनोव्हा आयफोन ६ पिंक डायमंड’ हा फोन वापरतात. २०१४ मध्ये हा हँडसेट लाँच करण्यात आला होता. ‘एशिया न्यूजनेट’ने दिलेल्या माहितीनुसार हा फोन खास सेलिब्रिटींसाठी बनवला जातो. हा फोन पूर्णपणे २४ कॅरेट सोन्यापासून बनवला आहे. यावर प्लॅटिनमची कोटींग देखील आहे. त्यामुळे हा फोन पडला तरी तुटणार नाही. या फोनच्या मागे महागडा असा गुलाबी रंगाचा हिरा देखील आहे. हा फोन कोणाही हँक करू शकत नाही आणि जर हॅक करण्याचा प्रयत्न केलाच तर लगेचच त्याचा अलर्ट युजर्सला जातो. म्हणूनच या फोनची किंमत ३११ कोटी असल्याचं समजतं आहे. ‘मुंबई इंडियन्स’ या संघाच्या त्या मालकीण आहेत त्यातून जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या त्या पत्नी आहेत तेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टीवर एवढे पैसे त्या खर्च करत असतील तर आश्चर्य वाटायला नको.

काही वर्षांपूर्वी निता अंबानींनी एका मुलाखती आपण सर्वात महागड्या कपमधून चहा पित असल्याचं म्हटलं होतं. जपानचा सर्वात जुना क्रॉकरी ब्रँड ‘नोरिटेक’ च्या कपमधून आपण चहा घेतो असं त्या म्हणाल्या होत्या. या ब्रँडच्या एका कपची किंमत तीन लाखांच्या आसपास आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nita ambani use most expensive iphone falcon

ताज्या बातम्या