Nitish Kumar Viral Video: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला ज्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पायी चालत मोर्चा काढल्याचे सांगितले जातेय. हा बिहारच्या हक्काचा लढा आहे, असे ते म्हणताना ऐकू आले. बिहार राज्याला विशेष दर्जा मिळावा या मागणीसाठी नितीश कुमार यांनी मोर्चा काढल्याचा दावा वापरकर्त्यांनी केला. भीख नहीं न कर्जा दो बिहार को विशेष राज्य का दर्जा दो..!! अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवाय ऑगस्ट महिना येतोय असा इशाराही काही कॅप्शनमध्ये दिल्याचे आम्हाला दिसून आले. आमच्या तपासात या व्हिडीओचं सत्य समजलं आहे, ते नेमकं काय हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होत आहे व्हायरल?

X यूजर ShivRaj Yadav ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ व्हायरल केला.

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओमध्ये, नितीश कुमार सीमांध्रला (२०१४ मध्ये तेलंगणाच्या निर्मितीनंतरचे आंध्र प्रदेशचे उर्वरित राज्य) २४ तासांच्या आत भाजपाच्या पाठिंब्याने विशेष दर्जा देण्यात आला, बिहारसारख्या राज्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे असे म्हणताना ऐकू येत आहेत. असं नितीश कुमार यांनी अलीकडील कोणत्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे का हे तपासण्यापासून आम्ही आमचा तपास सुरु केला. आम्हाला यासंदर्भात कोणतेही वृत्त आढळले नाही.

व्हायरल व्हिडीओवर एबीपी न्यूजचा लोगो स्पष्ट दिसत होता त्यानंतर आम्ही यूट्यूबवर ABP News च्या चॅनेल वर “Nitish Kumar walks for special statehood of Bihar” हा कीवर्ड शोधला. यामुळे आम्हाला एबीपी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ पाहायला मिळाला.

व्हिडीओ चे शीर्षक होते: Nitish Kumar marches to Gandhi Maidan demanding ‘special status’ to Bihar

हा व्हिडीओ दहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता (२ मार्च २०१४). आम्हाला त्यासंबंधीच्या बातम्याही आढळल्या.

https://www.ndtv.com/india-news/nitish-kumar-on-bandh-demanding-special-status-for-bihar-highlights-552511

रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्याला विशेष दर्जाच्या मागणीसाठी पाटणाच्या गांधी मैदानावर आंदोलन करत आहेत.

https://www.dnaindia.com/india/report-nitish-kumar-marches-demanding-special-status-for-bihar-1966206

अहवालात नमूद केले आहे: केंद्र सरकारने सीमांध्र या नव्याने स्थापन झालेल्या राज्याला विशेष श्रेणी मंजूर केल्यानंतर राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करत कुमार यांनी राज्यव्यापी बंद पुकारला.

हे ही वाचा<< अमेरिकेतही नितीश कुमारच ‘की’ प्लेअर! एक फटका अन् पाकिस्तानचा डाव उधळला

निष्कर्ष: बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी करणारा नितीश कुमार यांचा मीडियाला मुलाखत देणारा व्हिडीओ जुना आहे. व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar marching against bjp demands special status to bihar catchy captions saying bheekh nahi karja do facts of bihar cm svs
Show comments