Kiren Rijiju 1980s Al photo : सोशल मीडियाच्या नेहमीच नवीन ट्रेंड येत असतात. एआयच्या काळात तर या ट्रेंडने नवे वळण घेतले आहे. एक प्रॉम्ट वापरायची आणि अफलातून फोटो तयार होतो आणि मग हाच प्रॉम्ट नवीन ट्रेंड होतो. काही दिवसांपूर्वी असाच जीबीली फोटोज तयार करण्याचा ट्रेंड चर्चेत आला होता आता आय (AI) टूलच्या मदतीने १९८० च्या दशकातील (80s Look) व्हिंटेज स्टाइलमध्ये री-क्रिएट करण्याचा ट्रेंड करण्याचा नवा ट्रेंड तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर जिकडे तिकडे १९८०च्या दशकाती फोटो दिसत आहे. सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत अनेकांचे एआय वापरून १९८० मधील लूकचे फोटो व्हायरल केले जात आहे.

भाजपाचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत असलेल्या ‘१९८० चा एआय ट्रेंड’ (80s AI Trend) मध्ये सहभागी होत एक खास फोटो शेअर केला आहे. सर्वजण एआयच्या माध्यमातून स्वत:ला ८० च्या दशकातील फोटो तयार करत आहे तर असताना पण रिजिजू यांनी थेट १९८० च्या दशकातील स्वत:चा खराखुरा फोटो पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडियावरील ट्रेंडला दिलेला हटके ट्विस्ट (A Unique Twist to the Viral Trend)

सोशल मीडियावर सध्या चॅटजीपीटी (ChatGPT) आणि इतर एआय टूल्स वापरून ८० च्या दशकातील लूक, फॅशन, केस आणि फोटोग्राफी स्टाइल री-क्रिएट करण्याची क्रेझ सुरू आहे. या ट्रेंडमध्ये अनेक नेटकरी आपले ८० च्या दशकातील काल्पनिक फोटो पोस्ट करत आहेत.

किरेन रिजिजू यांनी सुरुवातीला स्वतःचा एक एआय-जनरेटेड व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते निळा शर्ट, राखाडी ब्लेझर, गॉगल आणि कारसोबत ८० च्या दशकातील पोजमध्ये दिसत होते. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपला खरा फोटो शेअर करत एआय ट्रेंडला एक मजेदार वळण दिले.

‘नो एआय, नो चॅटजीपीटी’ (No AI, No ChatGPT: Real Throwback)

आपला मूळ फोटो पोस्ट करताना किरेन रिजिजू यांनी लिहिले, “प्रत्येकजण चॅटजीपीटीला विचारत आहे की ते ८० च्या दशकात कसे दिसले असते. मी शॉटकार्ट घ्यायचे ठरवले आहे. नो एआय आणि नो चॅटजीपीटी. हा ८० च्या दशकातील माझा खरा फोटो आहे.”

या खऱ्याखुऱ्या जुन्या फोटोमध्ये किरेन रिजिजू यांनी लेदर जॅकेट, शर्ट आणि ट्राउझर परिधान केली असून ते एका स्मार्ट पोजमध्ये दिसत आहेत. अगदी एखाद्या कोरिअर हिरोप्रमाणे ते हँडसम दिसत आहे. त्यांचा हा खराखुरा ‘थ्रोबॅक’ फोटो आणि त्यांनी दिलेले कॅप्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून युजर्सकडून या पोस्टवर पसंतीचा वर्षाव होत आहे.

एआय व्हर्जनपेक्षा खरा फोटो नेटकऱ्यांना आवडला (Netizens liked the real photo more than the AI ​​version)

नेटकऱ्यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या या खऱ्याखुऱ्या १९८० च्या दशकातील फोटोवर कमेंट्सचा जोरदार पाऊस पाडला आहे. “सर, तुम्ही तर बॉलिवूडमध्ये जायला हवे होते, तुम्ही एकदम हिरो मटेरियल आहात!” अशा शब्दांत एका युजरने त्यांच्या लूकचे कौतुक केले, तर दुसऱ्या युजरने “हा फोटो १९८९ मधील असावा आणि तो ८० च्या दशकातील फोटो म्हणून अगदी योग्य बसतो” अशी प्रतिक्रिया दिली. अनेक युजर्सनी “अशा देखण्या व्यक्तींना एआयच्या मदतीची अजिबात गरज नाही” असे म्हणत त्यांचे कौतुक केले.

काही नेटकऱ्यांनी तर मिश्किल टिप्पणी करत लिहिले, “सर तुम्ही मस्करी करत आहात, हा तर तुमचा अगदी अलीकडचा (लेटेस्ट) फोटो वाटतोय!” तर काहींनी “ओरिजनल लुक समोर एआय कधीच टिकू शकत नाही” असे सांगत रिजिजू यांच्या नैसर्गिक लूकला पसंती दिली. “तुम्ही आधी बॉलिवूडमध्ये जायला हवे होते आणि नंतर राजकारणात प्रवेश करायला हवा होता” असा सल्लाही अनेकांनी त्यांना दिला. एकंदरीत, एआय व्हर्जनपेक्षा त्यांचा ओरिजनल अवतारच नेटकऱ्यांना अधिक भावला असून “एआय जनरेटेड बनावट फोटोची तुम्हाला काहीच गरज नाही, तुम्ही अत्यंत हँडसम दिसता,” अशा सकारात्मक आणि रंजक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.