सोशल मीडियावर रोज साहसी खेळांचे कित्येक व्हिडिओ समोर येत असतात जे चित्तथरारक असतात. कधी कोणी उंचावरून खाली उडी मारताना दिसते, तर कोणी उंच पर्वतांवर ट्रेकिंग करताना दिसते, कधी कोणी विमानातून उडी मारते, तर कोणी हॉट एअर बलूनमधून उडी मारते अर्थात त्यांच्याकडे पॅरशूट असते. कधी कोणी खळखळ वाहत्या नदीमधून रिव्हर राफ्टिंग करताना दिसते. या साहसी खेळात सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट असते पण कोणी लाईफ जॅकेटशिवाय किंवा कोणत्याही बोटशिवाय रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटत असेल तर….या सारखी थरारक अनुभव काय असू शकतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एका चिमुकल्याने हा थरारक अनुभव घेतला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक चिमुकला मुलगा चक्क टायर ट्यूब वापरून रिव्हर राफ्टिंग करत आहे.
आकालच्या पिढीला हिंडण्या-फिरण्याबरोबरच साहसी खेळांचा आनंद घ्यायला आवडते. त्यामुळे अनेकदा तरुणाई ज्यामध्ये ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, माउंटन बाइकिंग, हॉट एअर बलूनिंग, रिव्हर राफ्टिंग, कायाकिंग, स्कूबा डायव्हिंग, सर्फिंग, झिपलाइनिंग, पॅराग्लायडिंग, स्कायडायव्हिंग, बंजी जंपिंग, फॉरेस्ट कॅम्पिंग, वन्यजीव सफारी, रॅपलिंग….अशा कित्येक साहसी गोष्टी करताना दिसतात. यापैकी कोणतीही गोष्ट करण्यासाठी एखाद्याच्या अंगी धाडस लागते. काही गौष्टी कौशल्य आत्मसात करून शिकता येतात पण त्यासाठी धाडसी असणे महत्त्वाचे असते. अर्थात या सर्व गोष्टी करताना योग्य सुरक्षा व्यवस्था असते आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच साहसी खेळांचा आनंद घेता येतो. पण सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला कोणत्याही सुरक्षेशिवाय रिव्हर राफ्टिंगचा आनंद लुटत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, वाहत्या नदीमध्ये एकीकडे एक बोट जात आहे ज्यामध्ये लाईफ जॅकेट घालून बसलेले काहीजण रिव्हर राफ्टिंग करत आहे तर दुसरीकडे एक चिमुकला मुलगा चक्क टायर ट्यूब पाण्यात टाकून त्यावर उभा राहिला आहे. मोठ्या प्रयत्नाने तो संतुलन साधून उभा आहे. नदीच्या पाण्यासह त्याची ट्यूब पुढे पुढे जात आहे पण तरी तो मागे हटला नाही. सुरक्षा जॅकेट नसताना असे साहस करणे खरं तर अत्यंत धोकादायक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
travelling.shillong नावाच्या पेजवरील हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, चिमुकल्याचे नदीतील साहस, बॉसप्रमाणे नदीच्या पाण्यावर तरंगत आहे.(KID’S RIVER ADVENTURE! Floating Like a Boss! )
तसेच कॅप्शनमध्ये छोटासा अॅक्शन हिरो! रिव्हर ट्युबिंग एखाद्या तज्ञासारखे करत आहे असेही लिहिले आहे.
व्हिडिओवर कमेंट करत एकाने लिहले की, “त्याचे आयुष्य सर्वोत्तम प्रकारे जगत आहे.”
दुसऱ्याने कमेंट केली, “पुस्तकी ज्ञान विरुद्धातील खऱ्या आयुष्यातील ज्ञान”
तिसऱ्याने कमेंट केली की, काय बॅलन्स आहे. एकदम भारी!
चौथ्याने लिहिले की, “शहरी लोक आणि गावाकडील उत्साही लोक”सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक चिमुकला मुलगा चक्क टायर ट्यूब वापरून रिव्हर राफ्टिंग करत आहे.