Heart Touching Viral Video : एकटेपणा ही फक्त भावना नाही तर अनेकांसाठी हा आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष आहे. आजही आपल्या आसपास असे लोक आहे ते जे आपल्या आयुष्यातील संकटांचा, आव्हानांचा एकट्यानेच सामना करत आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे कोणीही नसते. काही लोक असे आहेत ज्यांकडे हक्काच्या नात्याची एकही व्यक्ती नाही तर काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे हक्काची नाती असूनही ते एकटे आहेत. एकटेपणाची ही भावना अत्यंत त्रासदायक असते आणि मनासा सतत आतून पोखरत राहते. अशाच परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका रिक्षाचालकाची गोष्ट चर्चेत आली आहे जी अनेकांच्या हृदयाला हात घालत आहे.
रात्री उशिरा रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा हृदयस्पर्शी अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. उशीरापर्यंत रिक्षा चालवणाऱ्या चालकाशी जेव्हा त्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.. इंस्टाग्राम वापरकर्ता निखिलने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, रिक्षाच्या मागच्या सीटवरून टिपलेले शांत दृश्य दिसते.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये,एक रिक्षाचालक रात्रीच्यावेळी सामसूम रस्त्यांवर रिक्षा चालवताना दिसत आहे. चालक शांत आणि एकाग्र दिसतो. व्हिडीओवर लिहिलेल्या मजकूरनुसार, “आज माझ्या रिक्षाचालक काकांनी मला एक अनपेक्षित गोष्ट सांगितली. चालक अंदाजे पन्नाशीच्या उत्तरार्धात किंवा साठीच्या सुरुवातीच्या वयाचा दिसत होता, तरीही दिवसाचा बराच वेळ रिक्षा चालवून घालवत होता.
उत्सुकतेने, प्रवाशाने रिक्षाचालकाला विचारले की,”या वयातही तो इतके अथकपणे काम का करत आहात? चालकाने उत्तर दिले की,”मी हे काम आता पैसे कमावण्यासाठी करत नाही, तर तो वेळ घालवण्याचा एक मार्ग आहे. चालकाने पुढे आपल्या आयुष्याबद्दल सांगितले की, “त्याचे लग्न होऊन ३० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि त्याला तीन मुली आहेत, ज्या आता वेगवेगळ्या शहरांमध्ये राहतात. तो अनेक वर्षांपासून एका ठरलेल्या नित्यक्रमाचे पालन करत होता, ज्यात रात्री उशिरा घरी परतल्यावर त्याची पत्नी दारात त्याची वाट पाहत असे, त्याचा दिवस कसा गेला हे विचारत असे आणि त्याला गरमागरम जेवण देत असे. मात्र, त्याच्या पत्नीचे निधन झाले होते आणि तो एकटा पडला होता.”

यप्रवासाच्या शेवटी, प्रवाशाने विचारले की,” तो आता घरी जात आहे का? चालकाने हसून सांगितले की,”तो अजून थोडा वेळ गाडी चालवत राहील.” त्यावर प्रवाशाने कारण विचारल्यावर, तो चालक म्हणाला, “घरी जाण्याची इच्छा तेव्हाच होते जेव्हा घरी कोणीतरी तुमची वाट पाहत असते.” त्याच्या या उत्तराने प्रवाशाच्या काळजाला हात घातला.
व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना भावला आहे, ज्यामुळे प्रतिक्रियांची लाट उसळली आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “काही लोक गोंगाट आवडतो म्हणून नव्हे तर घरातली शांतता सहन होत नाही म्हणून घराबाहेर राहतात.” “मी कॅनडात आल्यापासून मला घरी यावंसं वाटत नाही. मी फक्त बाहेर काम करत राहतो किंवा उबर करतो, कारण घरातली शांतता मला सहन होत नाही. मी पूर्णपणे थकल्यावर घरी येतो आणि फक्त झोपू शकतो,” अशी एका दुसऱ्याने कमेंट केली.
“मी त्याचं दुःख समजू शकतो. तो त्याच्या पत्नीला किती तीव्रतेने मिस करतो, हे यावरून स्पष्ट होतं. त्याचं हे नुकसान देव भरून काढू शकत नाही, पण मला आशा आहे की त्याला तुमच्यासारखे लोक भेटतील, जे त्याला रोज बरं वाटायला लावतील,” अशी एका तिसऱ्या युझरने प्रतिक्रिया दिली.
