नोबेल विजेत्या मलाला युसूफझाईचं झालं लग्न; जाणून घ्या कोण आहे तिचा नवरा

नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई बर्मिंगहॅममध्ये लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो पोस्ट करून मलालाने ही माहिती दिली आहे.

Malala Yousafzai husband
नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई अडकली लग्नबंधनात (फोटो: @Malala / Twitter )

नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईचे बर्मिंगहॅममध्ये एका छोट्या समारंभात लग्न पार पडले. मलालाने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली आहे. फोटो पोस्ट करत मलालाने आम्ही घरी लग्न केले आहे आणि पुढील आयुष्याची वाट पाहत आहोत असे म्हटले आहे.तिने हा दिवस तिच्या आयुष्यातील “मौल्यवान” दिवस असल्याचे म्हटले.मलाला युसुफझाईने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिक्षण कार्यकर्ती आणि तिचे पती असेर मलिक आनंदी दिसत होते.

असेर मलिक कोण आहेत?

मलाला एक कार्यकर्ती म्हणून प्रसिद्ध आहे, तर तिचा नवरा असेर मलिक हे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) चा महाव्यवस्थापक (हाय परफॉर्मन्स) आहे.

असेर मलिक मे २०२० मध्ये संस्थेत सामील झाले, त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार आणि त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर विविध क्रिकेट इव्हेंटचे बरेच फोटो आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये नोकरी स्वीकारण्यापूर्वी, असेर मलिकने एका अमेच्युर लीगमध्ये उच्च रँकिंगची भूमिका बजावली होती.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या म्हणण्यानुसार, असेर हे खेळाडू-व्यवस्थापन एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अमेच्युर लीग लास्ट मॅन स्टँडमधील फ्रेंचायझीचे मालक होते.

(हे ही वाचा: वनप्लस फोन पुन्हा फूटला ! युजरच्या मांडीला झाली जबर जखम; जाणून घ्या बॅटरीचा स्फोट का होतो? )

त्यांनी पाकिस्तान सुपर लीग (PSL) फ्रँचायझी मुलतान सुलतान्समध्ये ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केले आहे आणि एक खेळाडू व्यवस्थापन एजन्सी देखील चालवली आहे.

असेर मलिक यांनी लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस (LUMS) मधून २०१२ (२००८-२०१२) मध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली.

असेर थिएटरशी देखील जोडले गेले आहेत कारण त्यांनी असेही नमूद केले आहे की ते नाट्यनिर्मिती करणार्‍या ड्रामालाइन या संस्थेचे अध्यक्ष होते.

असेर मलिक आणि मलाला युसुफझाई एकमेकांना कधीपासून ओळखतात हे स्पष्ट झाले नसले तरी ही जोडी किमान जून २०१९ पासून एकमेकांना ओळखत आहे.

( हे ही वाचा: Video: …अन् पद्म पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांसमोरच राष्ट्रपतींची दृष्ट काढली )

बर्मिंघम, यूके येथील एजबॅस्टन स्टेडियममध्ये पाकिस्तानचा जयजयकार करतानाचा एक ग्रुप सेल्फी त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि मलाला त्यावेळी त्याच्यासोबत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nobel laureate malala yousafzai married find out who her husband is ttg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या