शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आठवणीचा खजिना असते. शाळा म्हटलं तरी डोळ्यांसमोरून अंसख्य आठवणी जातात. शाळेतील दिवस किती सुंदर असतात ना. कसलीही चिंता नाही, मस्त आनंदाने बागडायचे, खेळायचे, अभ्यास करायचा, नवनवीन गोष्टी शिकायच्या, मित्र-मैत्रिणीबरोबर खेळायचे, डब्बा खायचा…नुसती धमाल! शाळेत जाण्याची मज्जा किती वेगळी होती ना, रोज शाळा भरल्याचे घंटा वाजायची, घंटा वाजण्याआधी शाळेत पोहचण्याची घाई सर्वांना असायची नाहीतर उशीरा आल्यावर शिक्षकांची छडी किंवा शिक्षा नको असायची. शाळा भरली की सर्व विद्यार्थी मैदानावर एकत्र येऊन प्रार्थना म्हणत असे, कवायत करत असे. आता या सर्व गोष्टी फक्त एक आठवण म्हणून फक्त आपल्या मनात घर करून आहेत. शाळेतील दिवसांच्या या आठवणी जागा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, व्हिडीओमध्ये शाळेसमोरील मैदानात बसलेले विद्यार्थी दिसत आहे. सर्वांनी शाळेचे गणवेश परिधान केले आहे. सर्वजण एका शिस्तीने रांग करून बसले आहेत. शिक्षिकांच्या सुचनानुसार बैठे व्यायाम करताना दिसत आहे. ही कवायत आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेत असताना कधी ना कधी हमखास केली असणार. आपल्यापैकी अनेकांना तेव्हा कवायत करताना कंटाळा येत होता पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की, "शाळेतील तो कवायतीचा तास किती महत्त्वाचा होता." व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. व्हिडिओ इंस्टाग्रामवर cop_pradnya__mh16 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "प्रत्येकाच्या शाळेतील आठवणी" हेही वाचा - चिमुकल्याच्या जीवाशी खेळ कशाला? रेल्वेस्थानकावर सरकता जीना चढताना महिलांनी धोक्यात टाकला लेकराचा जीव, Video Viral हेही वाचा - …अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत, जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, "दर शनिवारी अशी कवायत करायचे तेव्हा कंटाळवाणे वाटायचे, खरंच शाळेचे दिवस भारी होते, आता शाळेतील दिवस खूप आठवतात" दुसऱ्याने लिहिले की, "आयुष्यात हे दिवस परत आले पाहिजे" तिसऱ्याने लिहिले, "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी"