Finland PM Viral Video: फिनलँडच्या पंतप्रधान सना मारिन यांचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या मित्रांसह एका घरात पार्टीमध्ये सना नाचताना दिसत आहेत.या व्हिडीओनंतर फिनलँडच्या विरोधी पक्षांनी सना मरिन यांना दारू पिऊन असे धिंगाणे करणे शोभत नाही असे म्हणत नाराजीचा सूर लावला आहे. सना मरीन व्हिडीओचे प्रकरण वादात असतानाच ट्विटर वर मात्र वेगळाच ट्रेंड पाहायला मिळतोय. अनेक युजर्सनी विविध नेत्यांचे व्हिडीओ शेअर करून सना मरीन एकट्या नाहीत असेही म्हंटले आहे.

अलीकडेच शिंदे विरुद्ध ठाकरे वाद सुरु असताना जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी गोव्यात वास्तव्याला असणाऱ्या हॉटेलमध्ये डान्स करून केलेलं सेलिब्रेशन सुद्धा सोशल मीडियावर चर्चेत आहे. जर अशाप्रकारे आनंद साजरा करणे गैर नाही तर सना मरीन यांना दोष देण्याची सुद्धा गरज नाही असेही अनेकांनी म्हंटले आहे.

एकनाथ शिंदे समर्थक

भारतात अनेक राजकीय नेते हे पूर्वी कला क्षेत्रातून आलेले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मनोज तिवारी तर महाराष्ट्रात खासदार नवनीत राणा हे सर्व आधी कलाकार होते आणि मग त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्यामुळे अनेक प्रसंगी या नेत्यांमधील कलाकार बाहेर येऊन नाचताना गाताना सुद्धा पाहायला मिळाला आहे.

नवनीत राणा

यापूर्वी संजय राऊत यांच्या लेकीच्या लग्नात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत राऊतांनी केलेला डान्स सुद्धा बराच व्हायरल झाला होता.

संजय राऊत व सुप्रिया सुळे

सना मरीन यांच्या व्हायरल व्हिडीओ नंतर अनेकांनी इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांचा एका लग्नातील व्हिडीओ नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. जर जॉनसन यांना खाजगी आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे तर सना यांना सुद्धा ही सूट असायला हवी असे म्हणत अनेकांनी फिनलॅण्डच्या पंतप्रधानांची पाठराखण केली आहे.

बोरिस जॉनसन

डोनाल्ड ट्रम्प

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान सना मरीन यांनी आपण या पार्टी मध्ये डान्स केला, गाणी गायली यात काहीच अवैध किंवा गैर नाही. कोणतेही ड्रग किंवा दारूचे सेवन केलेले नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.