Hidden Truth of Red Colour: तुम्हाला अशा भडक लाल रंगाच्या किंवा अशा चकचकीत लाल रंगाच्या कँडी किंवा केक खूप आकर्षित वाटतात का, खरं तर आपण नकळतपणे ते खातोसुद्धा. पण टॉफी, कँडी, केक यामध्ये वापरला जाणारा हा लाल रंग नेमका कसा तार केला जातो हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर जर थांबा आणि हे वाचा. तुमच्या आवडत्या लाल गोड पदार्थांमध्ये एक गुपित आहे जे तुम्हाला समजल्यावर खूप वाईट वाटेल. स्ट्रॉबेरी, चेरी किंवा रास्पबेरीची चव पाहून तुम्हाला वाटेल की कँडी किंवा लाल खाद्यपदार्थांचा रंग या फळांपासून आला आहे, पण यामागचं सत्य काही वेगळंच आहे. ते जाणून घेतल तर पुढच्या वेळी तुम्ही हे पदार्थ खाण्याआधी हजारदा विचार कराल.

काय आहे लाल रंगाचं सत्य?

तुमच्या आवडत्या लाल कँडी, पेय, केक किंव आईस्क्रीममध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगाला कोचिनियल अर्क किंवा कार्माइन म्हणतात. याच्या नावावरून तर असं वाटतं की, ते एखाद्या विशिष्ट फळ किंवा वनस्पतीपासून घेतलेले असू शकते. मात्र ते फळ किंवा फुलापासून घेतलेले रंग नाही, तर एका विशेष कीटकापासून घेतलेले आहे.

कीटकापासून तयार होतो लाल रंग?

कोचिनियल हा एक लहान कीटक आहे, जो प्रामुख्याने मेक्सिको आण दक्षिण अमेरिकेत आढळतो. हे कीटक वाळवले जातात आणि लाल पावडर तयार करण्यासाठी बारीक केले जातात. ते नंतर कँडी, रस, आईस्क्रीम, लिपस्टिक आणि इतर अनेक उत्पादनांमध्ये जोडले जातात.

हा रंग कसा बनवला जातो?

सर्वात आधी कोचिनियल कीटक गोळा केले जातात आणि नंतर उन्हात वाळवले जातात. वाळलेल्या कीटकांना बारीक करून लाल पावडर तयार केली जाते. ही पावडर नॅचरल रेड ४ किंवा कार्माइन या लेबलखाली पॅक केली जाते आणि अन्न तसंच पेयांमध्ये मिसळली जाते.

ही पावडर हानिकारक का आहे?

अन्न सुरक्षा संस्थांनुसार, कोचिनियल डाई कमी प्रमाणात सुरक्षित मानी जाते. असं असताना अनेक लोकांना त्याची अॅलर्जी असू शकते आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा रंग कीटकांपासून तयार केला जातो. जे शाकाहारी आहेत त्याच्यासाठी तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हा रंग कीटकांमुळे येतो, वनस्पतीपासून नाही.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लाल कँडी, लाल पेय, केक किंवा आईस्क्रीम खरेदी कराल तेव्हा त्या पॅकेटवर कोचिनियल एक्स्ट्रॅक्ट, E120 किंवा कार्माइन लिहिलेले असेल, तर त्यात कीटापासून तयार केला जाणारा रंग मिसळल्याची शक्यता आहे.

दरम्यान यावरून असं सिद्ध होत नाही की सर्व खाद्यपदार्थांमध्ये कीटकांचा वापर करून तयार केलेला रंग वापरला जातो. मात्र, काही भेसळयुक्त उत्पादनांमध्ये हा प्रकार घडण्याची शक्यता आहे.