सर्वच ठिकाणी डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडते तेव्हा ती व्यक्ती डॉक्टरांकडे जाते. गंभीर आजार असल्यास डॉक्टर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आपल्या रुग्णांची काळजी तर घेतातच परंतु त्यांच्यापेक्षाही वॉर्डमध्ये असणाऱ्या नर्स आपल्या रुग्णाची अधिक काळजी घेतात. इतकेच नाही तर या नर्स रुग्णाची औषधे, इंजेक्शन, त्यांचे खाणे-पिणे या सगळ्याचीच काळजी घेतात. तथापि, जेव्हा रुग्ण बरा होऊन आपल्या घरी जात असतो तेव्हा तो फक्त डॉक्टरांचे आभार मानतो. मात्र अनेकदा ज्यांनी आपली सेवा केली आहे त्यांचे आभार मानायला आपण विसरतो.

आपण किंवा आपले कुटुंबीय जेव्हाही हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ त्यानंतर बरे झाल्यावर तिथून निघताना संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आपण आभार मानले पाहिजे. एक नर्स आपल्या रुग्णाला उपचार देतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका अर्धांगवायू झालेल्या रुग्णाचे अवयव कार्यान्वित करण्यासाठी परिचारिका कशाप्रकारे प्रयत्न करत आहे. नर्स ज्या स्टेप्स करतेय, रुग्ण त्या सर्व स्टेप्स कॉपी करत आहे. आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये रुग्ण आणि परिचारिका एकमेकांचे कसे मनोरंजन करत आहेत हे आपल्याला पाहता येईल.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा

“आता फक्त बर्फ पडायचा बाकी” कडाक्याच्या थंडीमुळे मुंबईकरांचे झाले हाल; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

जाहिरातीत खराखुरा वाघ वापरल्याने Gucci ची झाली गोची; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “नर्सने अत्यंत हुशारीने डान्स करत अर्धांगवायू झालेल्या रुग्णाकडून फिजिओथेरपीचे व्यायाम करवून घेतले. रुग्ण जेव्हा बारा होतो तेव्हा सगळेजण डॉक्टरांचे आभार मानतात. मात्र नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या प्रेमळ उपचारांसाठी ‘धन्यवाद’ हा अतिशय लहान शब्द आहे.” आतापर्यंत जवळपास २३ हजारपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला असून लोकं या व्हिडीओला विशेष पसंती देत आहेत.