सध्या बऱ्याच पर्यटनस्थळी रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंग असे बरेच अॅडव्हेंचर गेम्स खेळायला मिळतात. धाडसी आणि उत्साही पर्यंटक याचा आनंद घेतातच. पण जीव धोक्यात टाकणारे हे खेळ चांगलेच महागात पडू शकतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. आकाशात झेपावलेला हॉट एअर बलून हवेतच क्रॅश झाला. त्यानंतर त्यातले प्रवासी सुद्धा खाली पडले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल, हे मात्र नक्की.

ही घटना कॅलिफॉर्नियामध्ये घडलीय. निकोलस मॅक्कॉल नावाचा व्यक्ती आयुष्यात पहिल्यांदा हॉट एअर बलूनचा आनंद घेण्यासाठी गेला होता. पण वेगवान वाऱ्यामुळे हा हॉट एअर बलून जमिनीवर आपटला. या अपघाताची घटना घडली तेव्हा स्वतः मॅकॉलने आपला मोबाईल कॅमेरा सुरूच ठेवला. यावेळी ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ स्वतः मॅकॉलने टिकटॉकवर पोस्ट केला होता. ज्यानंतर हा व्हिडीओ इतका पाहिला गेला की सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला. अनेकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला.

व्हिडीओ शेअर करताना मॅकॉलने लिहिले की, “हॉट एअर बलूनमधून प्रवास करण्याचा माझा पहिला अनुभव…हा खेळ खराब होईपर्यंत मजेशीर असणार होता.” २४ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मॅकॉल इतर काही लोकांसोबत हॉट एअर बलूनमधून फिरताना दिसत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, सॅन डिएगोजवळील पॅरिस शहरावर ते उड्डाण करत होते.

आणखी वाचा : बापरे! थेट सापासोबत भिडला इटुकला ससा; VIRAL VIDEO मध्ये पाहा कोणी जिंकली लढाई

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : लडाखच्या पॅंगॉंग लेकमध्ये दारूच्या नशेत चालवली SUV, VIRAL VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

अचानक जोरदार वारा सुटला आणि हॉट एअर बलून क्रॅश झाला आणि खाली कोसळला. या व्हिडीओमध्ये गाईडचा आवाजही स्पष्टपणे ऐकू येत आहे. तो ओरडून सर्वांना थांबायला सांगतो. गाईड म्हणाला, “थांबा! सगळे थांबा आणि बास्केटमध्ये रहा!”. या व्हिडीओमध्ये गाईड बलूनमधील प्रवाश्यांना त्याच्या बलूनमध्येच राहण्याचा सल्ला देताना ऐकू येत आहे. तो म्हणतो, “माझ्याबरोबर बास्केटमध्ये राहा. थांबा, जागेवरच राहा. मग बहून जमिनीवर जोरात आदळतो आणि जोरदार वाऱ्याने सरपटत जातो. जेव्हा बलून जमिनीवर आदळतो तेव्हा तुम्हाला लोकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो.”
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. डेली मेलनुसार, टिकटॉकवर ही क्लिप ६५,००० हून अधिक वेळा पाहिली गेली आहे. व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी घटनेच्या वेळी शांत राहण्याचे आवाहन केल्याबद्दल गाईडचे कौतुक केले.