Premium

…म्हणून त्याने मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापून काढला पळ; ओडिशामधील ‘त्या’ कुटुंबाने दिला आंदोलनाचा इशारा

Man Cuts Private Part Of Friend: दिल्लीमध्ये भररस्त्यात घडलेले हत्याकांड अजूनही चर्चेत असताना आता ओदिशामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Odisha Man Cuts Private Part Of Friend On Beach And Runs Away Penis Family Gives 24 hours Warning to Police
…म्हणून त्याने मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापून काढला पळ (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Man Cuts Private Part Of Friend: दिल्लीमध्ये भररस्त्यात घडलेले हत्याकांड अजूनही चर्चेत असताना आता ओडिशामधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भागवत दास नावाच्या ३० वर्षीय व्यक्तीने ओडिशामध्ये रविवारी त्याच्या मित्राचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही घटना राज्यातील केंद्रपारा जिल्ह्यातील आहे. अक्षय राउत असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही राजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेंठा समुद्रकिनारी गेले असता त्यांच्यात भांडण झाले. काही मिनिटांनंतर अक्षयने भागवत यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचे गुप्तांग कापले. नंतर त्याला राजनगर येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर (CHC) नेण्यात आले परंतु नंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्याला कटक येथील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, गुन्हा करून घटनास्थळावरून पळून गेलेल्या अक्षयचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी भागवत यांच्या नातेवाईकाने राजनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

हे ही वाचा<< वटपौर्णिमेच्या पूजेवेळी वडाच्या झाडाने घेतला पेट; थरारक Video व्हायरल, झाड जळत असतानाही महिला…

‘इंडिया टुडे’शी बोलताना भागवतचे काका संजय पांडा म्हणाले की, “माझा भाचा घरीच होता, तेव्हा त्याचा एक मित्र घरी आला. दोघेही जवळचे मित्र होते आणि एकत्र नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते. म्हणून कदाचित चर्चेसाठी त्याला पेंठा समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेला. हल्ल्याची माहिती मिळताच आम्ही समुद्रकिनारी पोहोचलो, मात्र, तोपर्यंत भागवतला हेल्थ सेंटरला नेण्यात आले होते. २४ तासांत आरोपींविरुद्ध पोलिस कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन सुरू करू”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 12:43 IST
Next Story
Viral: कपलचं चक्क किंग कोब्रासोबत प्रि-वेडींग शूट; नेटकरी संतापले..म्हणाले “मराठा सेवा संघाचा निर्णय”