scorecardresearch

Premium

ओडिशा दुर्घटनेनंतर हॉस्पिटलचा व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप; PM मोदी येणार म्हणून… खरं प्रकरण काय?

Odisha Accident: ओडिशा मधील भयंकर रेल्वे अपघातानंतर आता हॉस्पिटलमधील काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीआधी हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं…

Odisha Railway Accident Shocking Photo Of Cuttack Hospital PM Narendra Modi Visit In Controversy What is Reality
ओडिशा दुर्घटनेननंतर हॉस्पिटलचा व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांचा संताप (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अंकिता देशकर

Odisha Railway Accident Viral Photo: लाइटहाऊस जर्नलिझमला काही फोटो सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात असल्याचे लक्षात आले. या फोटोजमध्ये दुरुस्तीची कामे सुरू असल्याचे दिसत आहे आणि असा दावा केला जात आहे की पंतप्रधान ओडिशा रेल्वे अपघात दुर्घटनाग्रस्तांना भेटण्यासाठी येणार असल्याने आता अचानक कटकच्या सरकारी रुग्णालयात नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Naveen N, जे डीएमके सदस्य आहेत, यांनी ट्विटरवर व्हायरल फोटो शेअर केले आहेत.

इतर वापरकर्ते देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल इमेजेसवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. असे केल्यावर आम्हाला आढळून आले की हे चित्र ‘जनरल हॉस्पिटल, मोरबी’ येथील आहेत. पुढे शोधल्यावर आम्हाला अनेक लेख सापडले ज्यात दोन फोटो आहेत.

बिझनेस टुडेवरील एका लेखात म्हटले आहे: सफाई कर्मचाऱ्यांनी व बांधकाम करणाऱ्या मजुरांनी इंडिया टुडेला सांगितले की, त्यांना पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी दुरुस्तीसाठी राजकोटहून त्यांना पाचारण करण्यात आले होते. आता हॉस्पिटलमध्ये नवीन वॉटर कुलर आणि हॉस्पिटलचे बेडही बसवण्यात येत आहेत.

हे आर्टिकल १ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले होते. आम्हाला असेच काही फोटो बाकी वेबसाईट्स वर देखील मिळाले.

आम्हाला इंडिया टुडे वर एक लेख देखील सापडला, जिथे मोरबी रुग्णालय प्रशासनाने यावर कमेंट केल्याचे सांगण्यात आले होते. रुग्णालयाने सांगितले की, “दर काही महिन्यांनी होणाऱ्या आता हे काम सुरु आहे व असे अनेक रुग्णालयांमध्ये होत आहे.”

हे ही वाचा<< २०० वर्षीय बौद्ध भिख्खू जेव्हा आशीर्वाद देतात… Viral Video पाहून नेटकरी भारावले पण मूळ सत्य वाचून व्हाल चकित

निष्कर्ष: ओडिशा ट्रेन दुर्घटनेनंतर आता मोरबी सिविल हॉस्पिटल येथील १ नोव्हेंबर, २०२२ रोजी चे फोटो व्हायरल होत आहेत. मोरबी पूल कोसळून १३४ जणांचा मृत्यू झाला होता यावेळी पंतप्रधान मोदींनी याठिकाणी भेट दिली होती. सध्या जो दावा करण्यात येत आहे की, हे व्हायरल फोटो अलीकडेच झालेल्या ओडिशा दुर्घटनेनंतर कटक येथील हॉस्पिटल मध्ये काम सुरु असल्याचे आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Odisha railway accident shocking photo of cuttack hospital pm narendra modi visit in controversy what is reality svs

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×